Wednesday, September 18, 2024
HomeमनोरंजनLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या मंडपात महिला बाऊन्सरची मुजोरी, अभिनेत्रीला धक्काबुक्की… व्हिडिओ...

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या मंडपात महिला बाऊन्सरची मुजोरी, अभिनेत्रीला धक्काबुक्की… व्हिडिओ व्हायरल

मुंबई | Mumbai

- Advertisement -

‘लालबागचा राजा’ हा नवसाला पावतो अशी त्याची ख्याती आहे. म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट बाप्पाकडे मागितली तर तो हमखास देईल असा लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे दरवर्षी या गणपतीच्या दर्शसाठी लाखोंची गर्दी जमा होते. अगदी मोठमोठे सेलिब्रिटी, खेळाडू, कलाकार आणि उद्योजक सुद्धा राजाच्या चरणी आपलं डोकं ठेवतात.

पण लालबागच्या राजाचे दर्शन घेताना सर्वाधिक हाल होतात, ते सर्वसामान्य माणसाचे आपण असं अनेकदा म्हणतो. पण आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या एका टीव्ही अभिनेत्रीलाही तिथल्या बाऊन्सरच्य मुजोरीपणाला सामोरं जावं लागल्याचं समोर आलं आहे. या अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली आहे.

‘पंड्या स्टोअर’ फेम अभिनेत्री सिमरन बुधरूप (Simran Budharup) तिच्या आईबरोबर लालबागचा राजाच्या (Lalbaugcha Raja Darshan) दर्शनासाठी गेली होती. सिमरनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने दर्शनाला जाण्याचा अनुभव खूप वाईट होता, असं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सिमरनने व्हिडीओ शेअर करून लालबागचा राजा पंडालच्या बाऊन्सर्सनी तिला आणि तिच्या आईला धक्काबुक्की केली असा आरोप केला आहे.

सिमरनने व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिलं, लालबागचा राजाच्या मंडपामध्ये घडलेल्या घटनेमुळे माझे मन अस्थाव्यस्थ झाले आहे. आज मी माझ्या आईसोबत ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला गेले होते. तेथील सुरक्षारक्षक आमच्यासोबत ज्या पद्धतीने वागले, तो अनुभव आमच्यासाठी फार विचित्र होता. माझी आई माझा फोटो काढत होती, ती फोटो काढत असतानाच तेथील सुरक्षरक्षकांनी माझ्या आईच्या हातातून फोन हिसकावून घेतला. होती. मी दर्शन घेत असताना ती माझा फोटो काढत होती. आम्ही दोघीही रांगेत दर्शनासाठी उभे होतो. ती पुढे होती आणि मी मागे. हिसकावून घेतलेला फोन आईने त्यांच्याकडे मागितला असता त्यांनी माझ्या आईला धक्काबुक्की केली.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये सिमरनने पुढे लिहिलं की, जेव्हा मी त्या बाऊन्सरसोबत बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनीही माझ्यासोबत गैरवर्तन केलं. माझ्यासोबत गैरवर्तवणुक करायला केल्यापासूनच मी त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करायला सुरुवात केल्यावर त्यांनी माझा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. (या व्हिडीओमध्ये ओरडणारी मी आहे. असं करू नका, तुम्ही काय करताय?” मी अभिनेत्री आहे हे कळल्यावर ते परत गेले.)

ही घटना जागरूकता आणि जबाबदारीची गरज असल्याचं दर्शवते. सकारात्मकता आणि आशीर्वादासाठी चांगल्या हेतूने लोक अशा ठिकाणी भेट देतात. त्याऐवजी, आम्हाला आक्रमकता आणि अपमान सहन करावा लागला. गर्दीवर नियंत्रण ठेवणं आव्हानात्मक आहे, हे मला माहीत आहे. पण भाविकांशी कोणतेही गैरवर्तन न करता सुव्यवस्था राखणे ही कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. घडलेल्या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी मी हा व्हिडीओ शेअर करत आहे. या व्हिडीओनंतर आयोजक आणि कर्मचारी इथे येणाऱ्या भाविकांशी आदराने वागतील अशी आशा आहे असंही सिमरन म्हणाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या