Saturday, November 16, 2024
Homeराजकीयअभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा केंद्र सरकारला सवाल !

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा केंद्र सरकारला सवाल !

मुंबई | MumbaI

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून अभिनेत्री कंगणा रानौतने शिवसेना आणि मुंबई पोलिसांना टार्गेट केले होते. यामुळे शिवसेनेसोबत झालेल्या खडाजंगीमुळे अभिनेत्री कंगणा रानौतला मुंबईत येण्यासाठी केंद्र सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली होती. मात्र यावरून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. एका वृत्त वाहिनिशी बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बोलताना म्हणाल्या की, “मॅडमना जी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती त्याचे पैसे कोण देतं?, तुमच्या आमच्यासारखा जो अ‌ॅक्ट ऑफ गॉड म्हणून टॅक्सपासून पळून जाऊ शकत नाही. तो कसंही केला तरी आपल्याला भरावाच लागतो. त्या कंगणाला करदात्यांच्या पैशातून वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली गेली ती काय म्हणून दिली गेली होती, असा सवाल उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे.

तसेच “1990 च्या दशकात 15 ते 16 अभिनेत्रींनी माझ्यासोबत आल्या होत्या. त्यातल्या 11 ते 12 अभिनेत्री या कुणाच्या ना कुणाच्या नात्यात होत्या. त्यामुळे घराणेशाही किंवा नेपोटेझिम हे आज आलेलं नाही. ते अनेक वर्षांपासून आहे. हे फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर प्रत्येक क्षेत्रात आहे. हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही ही चंद्र आणि सूर्याइतकीच लख्ख” असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्य आत्महत्येला सुरूवातीला बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरण्यात आलं होतं. त्यावेळी अभिनेत्री कंगणा राणावतने त्यावेळी थेट घराणेशाहीवर आरोप केले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या