Tuesday, March 25, 2025
HomeमनोरंजनAda Sharma: अदा शर्माने खरेदी केले सुशांत सिंह राजपूतचे घर?

Ada Sharma: अदा शर्माने खरेदी केले सुशांत सिंह राजपूतचे घर?

मुंबई | Mumbai

‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) ही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तिची सोशल मीडियावर प्रचंड फॉलोविंग आहे. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र आता अदा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

- Advertisement -

तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे घर (Sushant Singh Rajput Flat) खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. सुशांतने आत्महत्या केलेल्या त्या फ्लॅटमध्ये तीन वर्षांपासून कोणीही राहायला तयार नव्हते. त्यामुळे अदा शर्माने हा फ्लॅट विकत घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. अद्याप अभिनेत्रीने यासंदर्भात भाष्य केलेलं नाही.

यासंबंधित एक व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत पापाराझी अदाला विचारतात की, ‘तू हा फ्लॅट विकत घेतलास की नाही? एवढंच सांग.’ यावर अदा म्हणते की, “जे काही असेल ते मी पहिल्यांदा तुम्हालाच सांगेल.”

दरम्यान, सुशांत निधनानंतर त्याची हत्या असल्याचं बोललं जात होतं. पण पोलीस आणि सीबीआय म्हणण्यानुसार, सुशांतचा मृत्यू हा आत्महत्येमुळे झाला होता. सुशांत आता जरी या जगात नसला तरी त्याच्या आठवणी अविस्मरणीय आहेत. सोशल मीडियावर नेहमी त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळे आणि रोहित...

0
मुंबई | Mumbai राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर एका महिलेने (Woman) आरोप करत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सदर महिलेला...