Monday, September 23, 2024
Homeमुख्य बातम्याअमेरिकन शेअर बाजारात अदानींना मोठा झटका

अमेरिकन शेअर बाजारात अदानींना मोठा झटका

नवी दिल्ली | New Delhi  

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून अर्थविश्वात सतत घसरण होत असल्याने चर्चेत असलेल्या अदानी उद्योग (Adani Group) समूह सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरही (international level) चांगलाच पिछाडीवर पडत आहे. या उद्योग समूहाचा आलेख ढासळू लागल्याने बाजारात मोठी खळबळ निर्माण झाली आहे…

अदानींचा उलट्या दिशेने सुरू असलेला प्रवास अजूनही थांबण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाही. हिंडेनबर्गच्या (Hindenburg Report) अहवालामुळे संसदेपासून शेअर बाजारापर्यंत (stock market) सगळीकडे हल्लकल्लोळ माजला आहे. तर अमेरिकेच्या डाउ जोंस स्टॉक एक्सचेंजने (Dow Jones Stock Exchange) अदानी एंटरप्रायझेसला (Adani Enterprises) सस्टेनबिलिटी इंडेक्समधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

संसदीय अधिवेशनात (Parliamentary Sessions) विरोधकांनी अदानी समूहावरील आरोपांची सखोल चौकशीची मागणी केली आहे. या मुद्यावरून शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी संसदेत गदारोळ झाला.

त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत, तर राज्यसभेचे कामकाज दुपारी २.३० पर्यंत तहकूब करण्यात आले आहे. विरोधकांनी अदानींच्या कथित घोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती (Joint Parliamentary Committee) किंवा सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) समितीमार्फत करण्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये शुक्रवारी सकाळी तब्बल ३५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. यामुळे एका शेअरची किंमत एक हजार रुपयांजवळ पोहोचली आहे. हिंडेनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी अदानींचा एक शेअर जवळपास ३५०० रुपयांवर होता. मागील ९ दिवसांत कंपनीचे शेअर्स ७० टक्क्यांनी घसरले आहेत.

तिकडे, बांगलादेश (Bangladesh) सरकारने सुद्धा अदानी समूहासोबतच्या ऊर्जा क्षेत्रातील (energy sector) सौद्यात दुरुस्तीची मागणी केली आहे. बांगलादेश (Congress) सरकारच्या मते, अदानींची वीज अत्यंत महागडी आहे. त्यांनी ती स्वस्त केली पाहिजे. काँग्रेसनेही या प्रकरणी ६ फेब्रुवारी देशव्यापी निदर्शनांचा इशारा दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या