Friday, October 11, 2024
Homeमुख्य बातम्यातुतीच्या शेतीतून पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड

तुतीच्या शेतीतून पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड

नाशिक | प्रतिनिधी

पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकरी आता जास्त उत्पादन देणाऱ्या तुतीची शेती करत आहेत. शेतकऱ्यांनी रेशीम शेतीतून आधुनिक प्रगती करत आपल्या शेती व्यवसायाचा गाडा रूळावर आणल्यामुळे त्यांच्या आर्थिक परीस्तीतीला हातभार लागण्यास मदत होत आहे.

- Advertisement -

रेशीम शेतीच्या माध्यमातून येथील शेतकरी लोखोंचे उत्पादन मिळवत आहेत. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीचा पर्याय स्वीकारला आहे.पारंपारिक शेती करत असताना खूप कष्ट करावे लागतात आणि हवा तसा मोबदला देखील मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत नाही. ही बाब ओळखून शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करत शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेतात तुतीची लागवड केली आहे.

शेती करत असताना एखाद्या जोड व्यवसायाची साथ नक्की असावी. आज शेती व्यतिरिक्त पशुसंवर्धन, कुकुट पालन, शेळीपालन असे जोडधंदे केले जातात. नवीन युगाचे नवीन व्यवसाय म्हणजेच रेशीम शेती. हा व्यवसाय अगदी कमी खर्चात केला जातो. आज रेशीम शेतीमध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात व कमीत कमी वेळेत सर्वात जास्त उत्पन्न घेता येते.

असा प्रकारे रेशीम शेती केली जाते.

रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे पाळावे लागतात. शेतकऱ्यांना कमीत कमी वेळेत महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न रेशम व्यवसायातून मिळवता येणे शक्य आहे. तुती लागवड कोणत्याही जमिनीत करता येते. शेतकऱ्यांनी सरी पद्धतीने तुतीची लागवड केली आहे. लागवडीपासून तूतूचा झाडाच्या पाल्याच्या उत्पन्नात वाढ होते. तुतीची लागवड एकदा केल्यानंतर १० ते १२ वर्षापर्यंत तुतीचे झाड जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही.

त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकाप्रमाणे वारंवार येत नाही. कमीत कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांपासून तो जास्तीत जास्त जमीन असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येतो. दुग्धव्यवसाय, कुक्कुट पालन यासारखे शेती पूरक व्यवसाय व ऊस, द्राक्षे यासारखी नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने फायदेशीर ठरतो आहे. कीटकांचे पालन खोलीच्या आतच केले पाहिजे. यासाठी सर्वप्रथम तुतीची पिशवी अडकवली जाते. मुख्यतः खोलीत स्वच्छ हवा आणि चांगली प्रकाश येण्याची व्यवस्था असावी.

उद्योगाला बाजारात मागणी

रेशीम वस्त्राला देशात आणि आपल्या राज्यात प्रचंड मागणी आहे. ही मागणी दरवर्षी वाढत जात असल्याने स्वयंरोजगार निर्मितीची प्रचंड ताकद या रेशीम शेतीत आहे. तुती लागवडीद्वारे पर्यावरणाचे रक्षण, रेशम कीटक संगोपन, धागा व वस्त्र निर्मिती, स्वयंरोजगार निर्मिती तसेच ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर रेशीम शेती उद्योगामुळे थांबवता येणे शक्य आहे. जिल्हास्तरीय योजनेमध्ये शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी सरकार मार्फद मोफत रोपे पुरवठा देखील केला जातो.७५ टक्के अनुदानाची रक्कम अनुदानामार्फद दिली जाते. शेतकऱ्यांकडून २५ टक्के रक्कम अंडीपुजना साठी घेतली जाते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेता येते. २५ ते ३० दिवसात उत्पन्न मिळते. मजुराचा व इतर खतांचा खर्च वाचतो. शेतकऱ्यांचा वेळ, श्रम, व पैसा वाचेल व तसेच एकूण उत्पादनात 25 टक्के पर्यंत वाढ होते. कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदिक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो. शेतीला जोड व्यवसाय म्हणून रेशीम शेती हा नक्कीच एक सर्वात जास्त नफा मिळणारा व्यवसाय आहे. अशी माहिती, शेतकरी अभिजित कुशारे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या