दिल्ली | Delhi
भारताची महत्त्वाकांक्षी सौर मोहिम आदित्य एल-१चे प्रक्षेपण शनिवारी २ सप्टेंबर रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून करण्यात आले. आदित्य एल-1 हा उपग्रह सूर्याचा अभ्यास करणार आहे. आदित्य एल-1 च्या प्रक्षेपणानंतर रविवारी इस्रोने महत्त्वाची अपडेट दिली आहे.
आदित्य-एल-१ ने आज पाहिल्यांदा आपली कक्षा बदलली आहे. आदित्य एल १ ने पृथ्वीच्या त्याच्या २३५X१९५०० किमीच्या कक्षेतून आता २४५X२२४५९ किमीच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. या द्वारे यानाने सूर्याच्या दिशेने जाण्याचे पहिले पाऊल टाकले आहे. आदित्य एल १ सहा दिवसांच्या कालावधीत पाच वेळा आपली कक्षा बदलून त्यानंतर L1 बिंदूकडे झेप घेईल.
शनिवारी २ सप्टेंबर रोजी सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित झाल्यानंतर केवळ ६३ मिनिटे आणि १९ सेकंदाच्या कालावधीत आदित्य एल-1ला पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आले होते. आज या यानाचे थ्रस्टर्स फायर करून त्याची कक्षा बदलली आहे. आदित्य एल १ चे संपूर्ण नियंत्रण पृथ्वीवरून केले जात आहे. हळूहळू आदित्य L-1 आपली कक्षा आणखी चार वेळा बदलेल. पुढील यानाची कक्षा ही ५ सप्टेंबर रोजी केली जाणार आहे १६ दिवस पूर्ण झाल्यावर आदित्य यान सूर्याच्या अभ्यासाठी एल १ या बिंदु कडे जण्यासाठी मार्गक्रमण करेल.
Rajasthan : राजस्थानमध्ये मणिपूर सारखे कृत्य! महिलेला विवस्त्र करून धिंड काढली
आदित्य एल-१ चार महिन्यांत १.५ दशलक्ष किलोमीटर अंतर कापून लॅन्ग्रेंज पॉइंट-१ गाठेल. हा असा बिंदू आहे जिथे सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण संतुलित होते. येथे एखाद्या वस्तूला राहण्यासाठी जास्त ऊर्जा लावावी लागत नाही. दुसरे म्हणजे, येथून सूर्यग्रहणाचा कोणताही प्रभाव होणार नाही, अशा स्थितीत आदित्य एल-१ सूर्याच्या सातत्याने अभ्यास करण्यासाठी सक्षम होणार आहे. आदित्य एल-१ मधील फायरिंगद्वारेच हे एल-१ वर हॅलो ऑर्बिटमध्ये स्थापित केले जाईल.
Maratha Andolan : लाठीचार्ज केला, गोळ्या झाडल्या.. हे दहशतवादी आहेत का?; छत्रपती संभाजीराजेंचा संताप
आदित्य मोहिमेतून सूर्याचा अभ्यास करणार
आदित्य-एल१च्या प्रक्षेपणानंतर हा उपग्रह सुमारे ४ महिने अंतराळात प्रवास करणार असून सूर्य आणि पृथ्वीमध्ये असणार्या एका लँग्रेज पॉईंटवर आदित्य-एल१ हा उपग्रह स्थापित होईल. आदित्य एल-१ ही मोहीम केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी फायदेशीर ठरणार आहे. या मोहिमेद्वारे इस्रो मुख्यतः अंतराळातील सौरवादळे, तेथील तापमानवाढ आदी बाबींवर प्रकाश टाकणार आहे. अंतराळातील घडणार्या या बाबींचा परिणाम पृथ्वीवर कशाप्रकारे होणार असून यामुळे जीवसृष्टीला आगामी काळात कोणत्या संकटांचा सामना करावा लागणार आहे, या गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे.