Tuesday, September 17, 2024
Homeराजकीयउंचीप्रमाणे त्यांची बालबुद्धी; आदित्य ठाकरेंचा राणे कुटुंबीयांना खोचक टोला

उंचीप्रमाणे त्यांची बालबुद्धी; आदित्य ठाकरेंचा राणे कुटुंबीयांना खोचक टोला

मुंबई । Mumbai

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गच्या मालवणमधील पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पोहोचले होते.

शिवसेना उबाठाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे किल्ल्यावर पोहोचताच ठाकरे आणि राणे समर्थकांनी एकमेकांविरोधात घोषणा दिल्या. यावेळी किल्ल्यावर जोरदार राडा झाला असल्याचं पाहायला मिळालं. यामुळे राजकोट किल्ल्यावर दोन तास तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर आदित्य ठाकरे राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर चांगलेच चिडल्याचं पाहायला मिळालं. तसंच उंचीप्रमाणे बालबुद्धी असा टोला लगावला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही किल्ल्यात निट येते होतो. ही लढाई करण्याची जागा आहे का? ही बालबुद्धी किती दिवस सहन करायची. १०० टक्के माझ्यावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कारण, ते मला ते घाबरतात. माझ्या खिशात कोंबड्या नाही आहेत. उंचीप्रमाणे त्यांची बालबुद्धी आहे असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

हे ही वाचा : शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे ‘नॉट रिचेबल’

तसच, माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. पुतळ्यात भाजपावाले चोरी, भ्रष्टाचार करु शकतात हे आमच्या आकलनाच्या बाहेर आहे, तरी त्यांनी करुन दाखवलं आहे. जे झालं आहे ते व्हायलाच नको होतं. जगात समुद्रकिनारी असणारे अनेक पुतळे आहेत. ते आपटे कुठे आहेत? त्याला कोणी पळून जायला मदत केली आहे का? याची उत्तरं मिळायला हवीत. पीडबल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल केला आहे का?, असा सवाल देखील त्यांनी उपास्थीत केला आहे.

आमच्या कुठल्याही नेत्याच्या केसाला धक्काही लागला ना, तर बघा

दरम्यान या घटनेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस यंत्रणा तिथे काय करतेय? पोलीस तिथे असूनही हा राडा कसकाय झाला? आमचे सर्व नेते तिथे जाणार होते, हे सर्वांना माहिती होतं. या सरकारचं इंटेलिजन्स तोवर काय करतंय? मला वाटतं की गृहमंत्र्यांनी अपील केलं पाहिजे की, सगळ्यांनी शांततेची भूमिका घ्यावी.

हे ही वाचा : महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीची नांदी! ‘या’ बड्या नेत्यांमध्ये बैठक

आमचे नेते जयंत पाटील हे जाणार होते, हे पोलीस यंत्रणाला माहिती नव्हतं का? असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे. आमच्या सर्व नेत्यांची सुरक्षततेची जबाबदारी आता सरकारची आहे. हे अतियश चुकीचं आहे. जर आमच्या कुठल्याही नेत्याच्या केसाला धक्काही लागला ना, तर बघा काय होतं ते’, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी इशारा दिला आहे.

हे ही वाचा : संजय राऊतांचा मंत्री केसरकरांवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, थेट बुटाने मारले पाहीजे…

- Advertisment -

ताज्या बातम्या