Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबईकरांची लुट होतेय, हिंमत असेल तर टोलनाके बंद करा; आदित्य ठाकरे शिंदे...

मुंबईकरांची लुट होतेय, हिंमत असेल तर टोलनाके बंद करा; आदित्य ठाकरे शिंदे सरकारवर कडाडले

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईकरांच्या समस्या, टोलनाके (Tollnaka) आणि खड्डे यांच्यासह अनेक मुद्द्यांवरुन सरकारवर जोरदार निशाणा साधला.

- Advertisement -

मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘मुंबईचे इस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे हे दोन्ही एमएमआरडीएने बीएमसीकडे हस्तांतरीत करुन दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या खर्चातून या दोन्ही हायवेच्या मेनटनन्सचा खर्च केला जातो.

“सत्तेतील आमदाराला जास्त निधी मिळतो हा…”; दानवे-भुमरे बाचाबाचीवर आमदार संजय शिरसाटांची तिखट प्रतिक्रिया

हे जर होत असेल जर मुंबईकरांच्या करातून त्यांच्या पैशातून जर या दोन प्रमुख रस्त्यांचे मेनटेनन्स होत असेल तर अजूनही तिथे टोलनाका, होर्डिंगचा सर्व पैसा महापालिकेकडे जात नाही. हा पैसा एमएसआरडीसीकडे (MSRDC) का जात आहे?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, मुंबईकरांवर डबल जबाबदारी का? त्यांच्याकडून दुप्पट कर का आकारला जात आहे? ‘मुंबईतील रस्त्यांची परिस्थिती बिकट आहे. मुंबईकरांकडून दुप्पट कर आकारला जात आहे. मुंबईला पिळून काढले जात आहे. मुंबई- गोवा आणि मुंबई-नाशिक हायवेवरदेखील तिच परिस्थिती आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी ‘त्यांनी’ बनवलं जगातील सर्वात मोठं कुलूप; वजन अन् किंमत पाहून तुम्हीही व्हाल थक्क

या हायवेवर चंद्राऐवढे खड्डे पडले आहेत. या दोन्ही रस्त्यांसाठी आम्ही पैसे भरत आहोत. या सरकारने मुंबई- गोवा हायवे आणि मुंबई-नाशिक हायवेचे काम पूर्ण करु शकले नाहीत. BEST चे देखील हाल झाले आहेत.

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष देणे गरजेचे होते. पण शिंदेंच्या दिल्लीवाऱ्यांमुळे राज्यातील प्रश्न वाऱ्यावर आहेत. सरकारकडून मुंबईकरांची लूट सुरु आहे. हिंमत असेल तर टोलनाके बंद करा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिले आहे. ‘जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

भर बैठकीत अंबादास दानवे आणि संदीपान भुमरेंमध्ये जुंपली, थेट अंगावर गेले धावून… VIDEO व्हायरल

- Advertisment -

ताज्या बातम्या