मुंबई | Mumbai
अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा(sushant singh rajput death case) तपास आता सीबीआय(CBI) करत आहे. या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहे.
त्यातच पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (tourism and environment minister aaditya thackeray) यांनी आपल्या ट्विटवर प्रोफाइल(twitter profile) मध्ये बदल केला आहे. राज्यातील विरोधी पक्ष सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करत आहे. तसेच मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात जोडले जात आहे. मात्र त्यातच आदित्य ठाकरे यांनी ट्विटवर प्रोफाइलमध्ये बदल केला असून प्रोफाइलमधून पर्यटन आणि पर्यावरण मंत्री हे शब्द काढून टाकला आहे. आणि फक्त युवा सेनेचे अध्यक्ष(president, yuva sena), मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबाल असोसिएशनचे अध्यक्ष(president mumbai district football association) ठेवण्यात आले आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. आदित्य ठाकरे आपल्या मंत्री पदाच राजीनामा देणार की त्यांना नवीन मंत्रिपद भेटणार अश्या चर्चा सद्या सोशल मीडियावर(social midia) सुरू झाल्या आहेत.