Friday, November 15, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात गंभीर परिस्थिती; प्रशासनाची तयारी कागदावरच

नाशकात गंभीर परिस्थिती; प्रशासनाची तयारी कागदावरच

नाशिक : Nashik

शहरासह नाशिक जिल्हा क्रिटिकल स्टेजमध्ये (critical) असून प्रशासनाची तयारी नुसती कागदावर नको तसेच सर्व हॉट स्पॉटवर तातडीने तपासणी केली पाहिजे. त्यानंतरच परिस्थिती नियंत्रणात येईल, असे सूचक विधान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी नाशिक शहर कोरोना प्रादुर्भावाची स्थिती व उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.

- Advertisement -

आज सकाळच्य सुमारास फडणवीस हे नाशकात आले. त्यांनी सुरवातीला जिल्हा रुग्णालयाला भेट देत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी बिटको रुग्णालयातील कोविड सेंटर येथे पाहणी केली. नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्याच्या करोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की नाशिकची परिस्थिती नाजूक होत चालली असून वेळीच याला अटकाव करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की तसेच टेस्टिंगचा वेग वाढवणे आवश्यक असून हे रिपोर्ट २४ तासांत येणे आवशयक आहे. त्यामुळे त्यामुळे मृत्युदर वाढत असून वेळीच रिपोर्ट आले तर रुग्णावर उपचार करण्यास वेळ मिळतो असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार भारती पवार आदी भाजप पदाधिकारी उपस्थित आहेत.

फडणवीस दौरा, ठळक मुद्दे

– शहीद सचिन मोरे यांना श्रद्धांजली

– ICMR ने अग्रेसिव्ह टेस्टिंगची गाईडलाईन दिली आहे

– टेस्टिंगचा वेग वाढविण्याची आवश्यकता

– रुग्णांना बेड आणि टेस्ट रिपोर्ट वेळेवर मिळत नाही

– हे रिपोर्ट 24 तासात येणं आवश्यक

– खाजगी हॉस्पिटलमध्ये अवाजवी बिलांचा मोठा फटका बसतोय

– सरकारने नुसतं ऑडिट करून उपयोग नाही

– सरकारने GR मध्ये त्वरित सुधारणा केली तर खाजगी हॉस्पिटल्सला चाप बसेल

– कोविड केअर सेंटरवर ऑक्सिजनसह इतर व्यवस्था हव्यात

– मास टेस्टिंग सुरू करणे आवश्यक

– राज्य सरकारने, महापालिकांना मदत केली पाहिजे

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या