Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रAdmission 2021 : अकरावी प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू, कटऑफ यंदा वाढणार?

Admission 2021 : अकरावी प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू, कटऑफ यंदा वाढणार?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला. ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होणार आहेत, तर राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने प्रवेश होणार आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अमरावती या महापालिका क्षेत्रातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. तर, राज्यातील उर्वरित भागात महाविद्यालय पातळीवर प्रवेश देण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल (शुक्रवार, १३ ऑगस्ट) ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक?

– १४ ऑगस्ट पासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

– १४ ते २२ ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशसाठी अर्ज भाग – 1 भरता येणार

– विद्यार्थ्यांना फॉर्म व्हेरिफाय करण्यासाठी जवळच्या कॉलेज, मर्गदर्शक केंद्रावर जाऊन व्हेरिफाय करावे

– १७ ऑगस्ट सकळी १० वाजल्यापासून ते २२ ऑगस्ट रात्री ११ पर्यत

– विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा भाग २ भरायचा आहे

– यामध्ये विद्यार्थ्यांना आपले कॉलेजचे पसंती क्रमांक भरायचे आहेत

– या दरम्यान विद्यार्थ्यांना अकरवी प्रवेशासाठी उपलब्द जागांची माहिती देण्यात येईल

– २३ ऑगस्ट सकाळी १० ते २४ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वसाधरण गुणवत्ता यादी जाहीर होणार

– अर्जात विद्यार्थ्यांना सुधारणा करण्याची असल्यास या दरम्यान वेळ दिला जाणार

– २५ ऑगस्टला अंतिम सर्वसाधरण गुणवत्ता यादी जाहीर होणार

– २७ ऑगस्ट सकळी १० वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार

– विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज मिळणार

– पहिल्या यादीनंतर कॉलेजचे कट ऑफ संकेतस्थळवर जाहीर होणार

– २७ ऑगस्ट सकाळी १० ते ३० ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत

– विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेले पसंतीचे कॉलेज निश्चित करायचे आहे

– अन्यथा पुढील फेरीसाठी पर्याय उपलब्ध असेल

-३० ऑगस्ट रात्री १० वाजता दुसऱ्या गुणवत्ता यादी साठी उपलब्ध जागा संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील

दरम्यान, दहावीच्या अंतर्गत निकालात विद्यार्थ्यांना भरभरून गुण मिळाले असल्याने यंदाच्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत विशेष चुरस होणार आहे. नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशांसाठी दरवर्षी आवश्यक असणारे पात्रता गुण (कटऑफ) यंदा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या