Saturday, July 27, 2024
Homeनाशिकजवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी प्रवेशासाठी आवाहन

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी प्रवेशासाठी आवाहन

नाशिक | प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता सहावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रकिया सुरू झाली असून १० ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाइन आवेदन पत्र सादर करावेत, असे खेडगाव (दिंडोरी )येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. व्ही. स्वामी यांनी कळविले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील जे विद्यार्थी, विद्यार्थींनी २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात इयत्ता ५ वी मध्ये शिकत आहेत, ज्यांची जन्मतारीख १ मे २०१२ ते ३१ जुलै २०१४ च्या दरम्यान आहे व नियमित इयत्ता तिसरी व चौथी उत्तीर्ण झाले असून जे विद्यार्थी नाशिक जिल्ह्याचे रहिवासी आहेत, असे विद्यार्थी प्रवेश चाचणी परिक्षेसाठी अर्ज भरण्यास पात्र आहेत.

ऑनलाईन अर्ज भरण्यासंबधी संपूर्ण माहिती नवोदय विद्यालय समिती नवी दिल्ली यांच्या www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर व तसेच जवाहर नवोदय विद्यालय समिती क्षेत्रिय कार्यालय, पुणे https://navodaya.gov.in/nvs/ro/Pune/en/home/index.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ही परिक्षा २० जानेवारी २०२४ रोजी नाशिक जिल्ह्यातील ३६ परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक, प्राचार्य व पालक यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहनही प्राचार्य एस. व्ही. स्वामी यांनी केले केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या