किशोरवयीन मुलांच्या आहाराचे महत्त्व
मॅडम,तुम्ही तरी काहीतरी सांगा ह्या शरयूला…8 वी पर्यंत वर्गात पहिली यायची..खेळ,डान्स,अभ्यास,सगळ्यात भाग घ्यायची…
आता इतकी आळशी झालीय… नुसती झोपा काढते. वर्गात सुद्धा झोपते..कुठेही जायचे म्हटले की सदैव कंटाळलेली….जेवतही नाही धड ..फक्त वरणभात नाहीतर खिचडी ……
शरयूची आई तिला माझ्यासमोर घेऊन बसली होती..शरयूमात्र शांतपणे खाली मान घालून ऐकत होती. तिची तपासणी केली असता रक्ताक्षय अर्थात अॅनिमिया या आजारावर शिक्कामोर्तब झाले. बऱ्याच वेळा ७ वी ते 9वीतील मुलींना पाळी सुरु होते ; दरमहा साधारण ३० ml रक्त पाळीच्या रूपातून निघून जात असते. त्यातून या वयातच अभ्यासाचे ,क्लासेसचे ओझे वाढलेले असते ,त्यामुळे त्यांच्या नाश्त्याच्या, जेवणाच्या वेळा नीट पाळल्या जात नाहीत, मग वेळ नाही म्हणून फक्त वेफर्स ,बिस्कीट कोंबले तोंडात अशी अवस्था!
बऱ्याच किशोरवयीन मुलामुलींना रोजच्या जेवणाचा कंटाळा आल्यामुळे ते बर्गर,पिझ्झा,वडापाव अशा ,फास्टफूडचा हट्ट करतात आणि आम्ही पालक तो कौतुकाने पुरवतो देखील. दुसऱ्या एका उदाहरणात, श्लोकला घेऊन त्याची आई आली होती.
[बऱ्याच वेळा मुलामुलींच्या आहाराची काळजी बिचार्या आईनेच घ्यावी असा अलिखीत नियमच असतो ]
अतिशय हुशार,अभ्यासू श्लोक १४ व्या वर्षी स्थूलपणाचा व त्यामुळे उद्भवणार्या इन्सुलिन रेझिस्ट्न्स या आजाराने ग्रस्त होता. दिवसभार फक्त अभ्यास व त्यातून विरंगुळा म्हणून मोबाईल व त्यावर भरपूर फास्टफूड ह्याचे ते उत्तम उदाहरण होते.
#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१२
जेवण नीट पचावे, त्यासाठी शारीरीक व्यायामदेखील िततकाच महत्त्वाचा असतो हे पालक जणु विसरुनच गेलेत.
अत्यावश्यक जीवनसत्वांची अ,ब, क,ड,इ,प्रथीने, लोह अर्थात हिमोग्लोबीन यांची कमतरता खालील लक्षणांवरून दिसून येते..
१)चिडचिडणेपणा.
२)भूक मांदावणे
३)निरुत्साह
४)अभ्यासात लक्ष न लागणे
#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-११
५)विसराळूपणा वाढणे
६) केस गळणे
७) हातपाय दुखणे
८)दृष्टीदोष
#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१०
खरे तर आपल्या रोजच्या जेवणात भरपूर प्रमाणात ह्या जीवनसत्वांची रेलचेल असते ,परंतू स्वयंपाक बनवण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे बरेच घटक नष्ट होतात.
त्यासाठी खालील काळजी घ्यावी :
१)भाज्या धुऊन मग चिरणे.
२)भाज्या फार शिजवू नयेत.
३)भाज्या झाकण ठेऊन कमी पाण्यात शिजवाव्यात. आधी जास्त पाणी टाकून मग पाणी आटवत शिजवू नये.
४) ताजे अन्न खावे.
५) पुन्हा पुन्हा अन्न गरम करत बसू नये.
रोजच्या जीवनातून खालील पदार्थांपासून आपण आवश्तयक ते पोषण व जीवनसत्वे सहज मिळवू शकतो.
१)रोजच्या जेवणात लिंबूच्या एका फोडीचा समावेश करावा. लिंबूू, आवळा, ही फळेही क जीवनसत्वाने भरपूर असून त्यामुळे तुमच्या जेवणातील लोहाचे पुरेपूर प्रमाणात शोषून घेतले जाते.
२)नागली कॅल्षीयमचे उत्तम स्रोत असून ज्वारी व नागलीची भाकरी, नागलीचा डोसा, नागलीची पेज,नागलीचा शिरा, अशा पदार्थांनी कॅल्षीयम मिळवता येईल.
३)जेवणात मिठाचे व साखरेचे प्रमाण कमी असावे.
४)गव्हाचे पीठ दळताना त्यात सोयाबीन टाकुन त्याचे पोषणमुल्ये वाढवता येईल.
५)शाकाहारी लोकांनी पनीर, सोया, व मांसाहारी लोकांनी चिकन, अंडी, मासे, ह्यांचा समावेश करून प्रथीने मिळवता येतील.
६)सालीच्या डाळींना भाजून त्यात इतर तणृ धान्ये,ज्वारी, नागली, बाजरी, टाकून, मष्ल्टीग्रेन पीठ बनवून त्याचे थालीपीठ, अथवा, दशम्या हा उत्तम पर्याय आहे.
७)बिट, गाजर, शेपू, पालक, मुळ्याच्या पाल्याची भाजी, मेथी, ह्या भाज्या पिठात टाकून त्यांच्या दशम्या करता येतात.
#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-९
८)फळांचे ज्युस पिण्यापेक्ष अख्खी फळे खावीत.
९)शांत चित्ताने अन्नाचा पूर्ण स्वाद घेऊन एका जागी बसून जेवावे.
१०)जेवताना तावातावाने बोलणे,वाचणे,मोबाईल,टीव्ही बघणे टाळावे.
११)शक्यतो सर्व कुटूंबाने एकत्र जेवण घ्यावे.
अशा प्रकारे जेवल्यास आपले षड्रस अर्थात पाचक रस योग्य प्रमाणात स्त्रवुन अन्नतील घटकांचे नीट शोषण होते. किशोरवयीन मुलामुलींचे शारिरीक व मानसिक अवस्थेचे खूप स्थित्यंतर होत असते. ह्यावेळी त्यांचे आहाराचे वेळापत्रक सांभाळणे खूपच गरजेचे आहे.
ह्या मुलामुलींमधूनच पुढची पिढी घडणार असल्याने त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, यात शंकाच नाही.
डॉ. रुचिता कमळे पावसकर
स्रीरोग तज्ञ