Anemia in adolescents
जेव्हा किशोरवयीन मुलांची हिमोग्लोबीनची पातळी कमी होते तेव्हा त्याला अनेमिया असे म्हणतात. हिमोग्लोबीनच्या पातळीनुसार अनेमियाचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण होते.
1) सौम्य अनेमिया ( mild anemia) – जेव्हा हिमोग्लोबीन चे प्रमाण 10 ते 12 Gm /dl दरम्यान असते
2) मध्यम अनेमिया (moderate anemia) – जेव्हा हिमोग्लोबीन चे प्रमाण 7 ते 10 g /dl दरम्यान असते
3) तीव्र अनेमिया (severe anemia) – जेव्हा हिमोग्लोबीन चे प्रमाण 7 पेक्षा कमी असते
अनेमियाची कारणे पुढीलप्रमाणे –
हॉर्मोनल changes मुळे खाण्या व्यतिरिक्त इतर गोष्टी कडे लक्ष्य असते. जंक फूड कडे जास्त कल असतो. जेव्हा मातेचे hb कमी असते त्यावेळी मुलांमध्ये देखील Hb कमी असू शकते
रोगप्रतिकार शक्ती कमी असणे मूळव्याध , ulcers, आहारात फॉलीक ऍसिड, लोह आणि Vit B12 चे प्रमाण कमी असणे मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव होणे 0 Figure च्या नादात विशेष करून मुली खूप कमी जेवण करतात, TB , Hypothyroidism , किडनी संबंधी विकार आतड्यामधील जंत असल्यामुळे.
#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-९
लक्षणे –
निस्तेज आणि पांढरी त्वचा
चक्कर येणे, थकवा येणे
छातीमध्ये धडधड होणे , नख ठिसूळ होणे चपटी होणे
सतत आजारी पडणे
श्वास लागणे , भूख न लागणे, केस गळणे
लक्ष्य केंद्रित न होणे, शरीरावर सूज येणे
#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-८
अनेमियाचे प्रकार
1) Iron Deficiency Anemia – रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा
2) pernicious Anemia – रक्तातील vit B12 च्या कमतरतेमुळे
3) Megaloblastic Anemia – रक्तातील फॉलीक ऍसिड च्या कमतरतेमुळे
4) Sickle Cell Anemia – आनुवंशिक कारणामुळे
#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-७
तपासणी –
CBC , Typing of Anemia , Proctoscopy Urine and stool examination Sonography, Dental examination Anemia होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी –
पोषक तत्व युक्त आहार घ्यावा, विशेष करून फॉलीक ऍसिड , vit B12 आणि लोह युक्त असावा.
मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव होत असल्यास स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा .
अनेमिया असेल तर आहार कसा असावा – आहारामध्ये पालक, लाल माठ, काळ्या मनुका, खजूर, पेरू, बिट, सफरचंद, गुळ, शेंगदाणे, तीळ, डाळिंब आणि अंजीर घेतल्यास लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते . दूध ,अंडी , टोफू , पोकळा, गाजर , शुद्ध तूप , लोणी , मटण, मासे , डाळी ,नागली ,ब्राउन राईस इत्यादी गोष्टी मुळे B12 आणि फॉलीक ऍसिड वाढण्यास मदत होते . व्हिटॅमिन C युक्त पदार्थ जसे कोबी, आवळा , कोथिंबीर , लिंबू यामुळे शरीरात लोह चांगल्या प्रकारे शोषले जाते .
#hERHealthकिशोरवयीन आरोग्य : भाग-६
इलाज / Treatment –
अनेमिया कोणत्या प्रकारचा आहे शिवाय किती HB आहे त्यानुसार तुमचे डॉक्टर treatment ठरवतात .
Mild anemia (10 -12gm) आहारातील बदल, आयर्न फॉलीक ऍसिड च्या गोळ्या घेऊन ट्रीटमेंट करता येते. आहारातील बदलाशिवाय injections घ्यावे लागू शकतात.
Severe anemia (less than 7) आहारातील बदल , टॅब्लेट्स , शिवाय रत्क्तदेण्याची गरज पडते . या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्या मुलांना रोज सकस आहार दिला पाहिजे ज्यात दूध , अंडी, हिरव्या पालेभाज्या , डाळी, भात , तूप ,फळे आणि लिंबाचा समावेश असावा .
डॉ. निशा पाटील- एमबीबीएस, डीजीओ
न्यू लाईफ हॉस्पीटल, जेलरोड, नाशिकरोड