Sunday, October 13, 2024
Homeजळगावहिस्सा वाटणीवरुन प्रौढाची रेल्वेखाली आत्महत्या

हिस्सा वाटणीवरुन प्रौढाची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शेतीच्या हिस्से वाटणीवरुन (division of agricultural shares) भावंडांमध्ये वाद सुरु होता. चार भावंडांनी (Argument between siblings) शेतीची वाटणी केली मात्र एकाला मात्र हिस्सा दिला नाही. त्याच कारणावरुन संजय चवदस सपकाळे (Sanjay Chavadas Sapkale) (वय-55, रा. कुवरखेडा ता.जि. जळगाव ह.मु. कासमवाडी जळगाव) यांनी धावत्या रेल्वेखाली (running train) स्वत:ला झोकून देत आत्महत्या (suicide) केल्याची घटना असोदा रेल्वेगेटजवळ घडली. आत्महत्येपुर्वी सपकाळे यांनी आपल्या शालकाला फोन करुन आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांसह नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. यावेळी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

शहरातील कासमवाडीत संजय सपकाळे हे पत्नी व मुलीसोबत वास्तव्याला असून ते रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या शेतातील हिस्से वाटणीवरून पाच भावांमध्ये वाद सुरू होता. दरम्यान इतर भावांना शेतातील वाटेहिस्से देण्यात आले होते. परंतु संजय सपकाळे यांना शेतातील कुठलाही हिस्सा देण्यात आलेला नव्हता, त्यामुळे माझा हिस्सा मिळावा या मागणीसाठी अनेक महिन्यांपासून ते भावंडांसोबत वाद सुरु होते. दरम्यान मंगळवारी 23 मे रोजी सकाळी शेतीच्या हिस्से वाटेवरून वाद झाला. त्यावेळी भाऊ यांनी शेती देण्यास नकार केला, या संतापाच्या भरात संजय सपकाळे यांनी शालक गजानन आधार सोनवणे यांना फोन करून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगून आसोदा रेल्वे फाट्याजवळ रिक्षा बाजूला लावून धावत्या रेल्वेखाली उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली.

हद्दीच्या वादामुळे मृतदेह दोन तास पडून

प्रौढाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. परंतु शनिपेठ व तालुका पोलीस ठाण्यातील रेल्वेच्या हद्दीचा वाद सुरु होता. या कारणामुळे तब्बल दोन तास मृतदेह घटनास्थळी पडून होता. अखेर शनिपेठ पोलिसांनी पुढाकार घेवून शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

संबंधितांवर गुन्हा दाखल करा

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रघुनाथ महाजन यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. दरम्यान आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मयत संजय सपकाळे यांची पत्नी कल्पना व मुलगी खुशी यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या