Monday, May 27, 2024
Homeजळगावव्यसनामुळे आलेल्या नैराश्यातून प्रौढाची आत्महत्या

व्यसनामुळे आलेल्या नैराश्यातून प्रौढाची आत्महत्या

जळगाव – Jalgaon

तालुक्यातील शिरसोली (Shirsoli) येथील अशोकनगरातील कैलास विठ्ठल सोनवणे वय ५२ यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार ३ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. कैलास यांना दारुचे व्यसन होते. व्यसनामुळे नैराश्य आल्यामुळे ही आत्महत्या (Suicide) केल्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

शिरसोली प्र.न. अशोकनगर मधील रहिवासी कैलास विठ्ठल सोनवणे (वय ५२) हे व पत्नी ज्योती, मुलगा योगेश यांच्यासह वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पुढच्या घरात कैलास सोनवणे हे एकटेच झोपलेले होते तर पत्नी व मुलगा मागच्या घरात झोपले होते. रात्री १०:३० वाजता कैलास यांची पत्नी उठली असता तिला पती कैलास यांनी छताच्या कडीला ओढणी बाधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. शिरसोली प्र.न. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी कैलास सोनवणे यांना जळगाव शासकीय महाविद्यालयात व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मयत कैलास सोनवणे त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जितेंद्र राठोड, राजु ठाकरे हे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या