Monday, June 17, 2024
Homeजळगावअ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा

अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा

मुंबई । Mumbai

- Advertisement -

सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Public Prosecutor Praveen Chavan) यांच्या कार्यालयात आ.गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांना अडकविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी विधानसभा (Legislative Assembly) अध्यक्षांकडे (Speaker) पेन ड्राईव्ह (Pen drive) सादर केला होता.त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी सोमवारी उत्तर देत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा (Resigned) दिल्याचे सांगत या संपूर्ण स्टिंग ऑपरेशनची (Sting operation) सीआयडी चौकशी करण्याची घोषणा केली.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी विधानसभेत (Legislative Assembly) बोलताना अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक हे पाच वेळा आमदार झाले आहेत. केंद्र सरकारच्या (Central Government) धोरणाच्या विरोधात ते आवाज उठवत होते. त्यांचा आवाज दाबण्यासाठी जुने प्रकरण उकरून कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत वळसे पाटील यांनी फडणवीस यांना तुम्ही गेली पाच वर्ष मुख्यमंत्री असताना नवाब मलिक यांच्या प्रकरणाचा तपास पूर्ण केला असता तर बरे झाले असते, असा टोला लगावला. यावेळी फडणवीस यांनी आपल्या आरोपाचे प्रकरण सीबीआयकडे (CBI) न दिल्याचा निषेध करत सभात्याग केला. त्याचवेळी याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला.

विरोधी पक्षाने नियम 293 अन्वये उपस्थित केलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरील चर्चेला वळसे पाटील यांनी आज उत्तर दिले. आपल्या उत्तरात त्यांनी भाजपला (BJP) चांगलेच टोले लगावले. फडणवीस यांनी 125 तासांचे स्टींग आँपरेशन (Sting operation) केले आहे. ते सगळे विधिमंडळाला दिले नाहीत. काही मागे ठेवलेत. तो त्यांचा प्रश्न आहे. हे संपूर्ण प्रकरण तपासावे लागेल. त्यामागे कोण आहे? त्यात कोण दोषी आहे. हे पाहिले पाहिजे. गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी सरकार षडयंत्र करत आहोत, असा आरोप केला आहे.

याबाबत स्पष्टता देताना वळसे पाटील म्हणाले, जळगाव जिल्हा मराठा प्रसारक मंडळ या संस्थेत वाद (Argument) सुरू आहे. हा वाद न्यायालयात गेला आहे. याचा तपास सुरू आहे. याबाबत भोईटे आणि पाटील यांच्यात वाद सुरू असून आतापर्यंत 29 अरोपींना अटक झाली आहे. पोलीस संरक्षणात या संस्थेचे कामकाज सुरू आहे. यामध्ये धमकविण्याची घटना पुण्यात घडली असून यामध्ये महाजन यांचे नाव घेतले आहे. म्हणून गुन्हा पुणे येथे नोंद झाला आहे.

प्रविण चव्हाण यांनी राजीनामा दिला असून राज्य सरकारने तो मंजूर केला असल्याचे सांगताना वळसे पाटील म्हणाले, या प्रकरणी मी कोणालाही पाठिशी घालणार नाही. जे दोषी असतील त्यांना शिक्षा (Penalty) होईल. या प्रकरणाची सीआयडी(CID) चौकशी करण्यात येईल. आपण पाच वर्षे मुख्यमंत्री असताना गृहमंत्रीपदही तुमच्याकडेच होते.पोलिसांचा एका बाजूला अभिमान असल्याचे म्हणता मग प्रत्येक प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी का करता? असा सवाल वळसे पाटील यांनी केला.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतानाच्या काळात पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी कशा प्रकारे राजकीय नेत्यांचे फोन टॅप (Phone tap) केले तो विषयही वळसे पाटील यांनी काढला. नाना पटोले, बच्चू कडू यांना अंमली पदार्थ विक्री करणारे दाखविण्यात आले. नाना पटोले यांना अमजद खान तर बच्चू कडू यांचे नाव निजामुददीन बाबू शेख असे ठेवण्यात आले. इतकेच नाही तर भाजपच्या संजय काकडे यांचे नाव तरबेज सुतार आणि आशीष देशमुख यांचा एक फोन रघू चोरगे आणि दुसरा फोन हीना महेश साळुंखे या स्त्रीच्या नावाखाली टॅप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

आरोग्य विभाग, म्हाडा, टीईटी विभागातील पेपरफुटी प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यातील बहुतांश आरोपींना पकडण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा तपास सुरू आहे. पुढच्या परीक्षा प्रक्रिया पूर्ण पारदर्शी पदधतीने होतील याची काळजी घेण्यात येत असलयाचेही वळसे पाटील म्हणाले.

राज्यात अनेक प्रकारचे आंदोलने (Movements) होतात. आरक्षण किंवा अन्य विषयावर आंदोलने होतात. कोरोना काळात खूप मोठ्या प्रमाणावर शासनाच्या नियमाचा भंग झाला होता. यावेळी राजकीय आंदोलनाचे कलम 188 अंतर्गत दाखल झालेले सर्व खटले मागे घेण्याचा तत्त्वतः निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.

आरोपी म्हणून नोटीस बजावली नाही

मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेली नोटीस ही त्यांना आरोपी म्हणून दिलेली नाही. गोपनीय कागदपत्रे आणि माहिती कशी काय बाहेर गेली याची माहिती घेण्यासाठी ही नोटीस दिली आहे, असा खुलासा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केला.

बीएचआर घोटाळ्याची उजळणी

जळगावमधील बीएचआर घोटाळ्याची (BHR scam) चौकशीबाबतचा विषयही वळसे पाटील यांनी काढला. या घोटाळ्यात 26 आरोपी असून त्याची चौकशी 2016 सुरु झाली आहे. जळगावमधील दोन्ही प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास करायचा की नाही? पोलिसांच्या तपासात सत्य समोर येऊन गिरीश महाजन त्यात निर्दोष राहिले तर या सर्व प्रकाराचा आनंद मला सर्वाधिक होईल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या