Saturday, September 21, 2024
Homeनगरखा. लंकेंचे सहकारी झावरेंविरुद्ध विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

खा. लंकेंचे सहकारी झावरेंविरुद्ध विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

पोलिस घेताहेत 24 जणांचा शोध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

पारनेर तालुक्यातील एका गावातील महिलेच्या घरी जाऊन खा. निलेश लंके यांचे सहकारी अ‍ॅड. राहुल झावरे याने साथीदारांच्या मदतीने तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आणि जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी (6 जून) घडली. या प्रकाराने घाबरून पीडित महिलेने कुटुंबासह गाव सोडले. त्यांनी शुक्रवारी (7 जून) नगरमधील तोफखाना पोलिस ठाण्यात घडलेली घटना सांगितली. पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अ‍ॅड. राहुल झावरेसह 24 जणांविरुध्द विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटी आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित पिडीत महिला गुरुवारी सकाळी घरासमोर उभी असताना साडेअकरा ते बाराच्या दरम्यान अचानक तीन ते चार चारचाकी वाहने त्यांच्या घरासमोर येऊन थांबली. त्यातून अ‍ॅड. राहुल झावरे, प्रसाद नवले, अनिल गंधाक्ते, संदीप ठाणगे, राजु तराळ, महेंद्र गायकवाड, संदीप चौधरी, नंदु दळवी, किरण ठुबे, रामा तराळ, जितेश सरडे, कारभरी पोटघन, दादा शिंदे, बापू शिर्के, बाजीराव कारखिले, किशोर ठुबे, सचिन ठुबे, दीपक लंके, दत्ता ठाणगे, लखन ठाणगे, अक्षय चेडे, बंटी दाते, गंधाक्ते (पूर्ण नाव नाही), संदेश बबन झावरे (सर्व रा. पारनेर) उतरले. अ‍ॅड. झावरे याने फिर्यादीला उद्देशून जातीवाचक

शिवीगाळ केली. नवरा कुठे आहे अशी विचारणा करून त्याला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून मारहाण केली व ढकलून देऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. दीपक लंके, संदीप चौधरी यांनीही जातीवाचक शिवीगाळ केली. राजू तराळ, महेंद्र गायकवाड, संदीप चौधरी, नंदू दळवी, किरण ठुबे, रामा तराळ, जितेश सरड यांच्या हातात लोखंडी कोयते, लाकडी दांडके होते. फिर्यादीने घाबरून नवरा घरात नसल्याचे सांगितले. त्यांच्या सासू-सासर्‍यांनी विनंती करून देखील अ‍ॅड. झावरे व त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ केली व तेथून निघून गेले. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपासासाठी तो पारनेर पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

दरम्यान, गुरुवारी दुपारी अ‍ॅड. राहुल झावरे यांच्यावर 15 ते 16 जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. त्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्या जबाबावरून पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या