Monday, June 17, 2024
Homeनाशिकनाशिक शहर काँग्रेसच्या प्रभारी शहराध्यक्षपदी अ‍ॅड.आकाश छाजेड यांची नियुक्ती

नाशिक शहर काँग्रेसच्या प्रभारी शहराध्यक्षपदी अ‍ॅड.आकाश छाजेड यांची नियुक्ती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या(Nashik City District Congress Committee )  प्रभारी शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा माजी शहराध्यक्ष म्हणून काम केलेल्या अ‍ॅड. आकाश छाजेड ( Adv. Aakash Chhajed )यांच्यावर पक्षाने सोपविली आहे.

प्रभारी शहराध्यक्ष पदी नियुक्तीचे पत्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार पक्षाचे सरचिटणीस (प्रशासन व संघटन) प्रमोद मोरे यांच्या स्वाक्षरीने छाजेड यांना देण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या हस्ते मुंबईत नियुक्ती पत्र छाजेड यांना देण्यात आले.यावेळी प्रमोद मोरे यांच्यासह प्रदेश काँगेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सन 2014 मध्ये तत्कालीन शहराध्यक्ष तथा माजी  नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांनी वैयक्तिक कारण देत नाशिक शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.तेव्हापासून पूर्णवेळ शहराध्यक्ष पदी पक्षाकडून अजुनही नियुक्ती करण्यात आलेली नाही.बोरस्ते यांनी राजीनामा दिल्यानंतर शरद आहेर यांच्याकडे प्रभारी शहराध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात आली होती.

आहेर हे तेव्हापासून प्रभारी म्हणून शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळत होते. दरम्यान,आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या निर्देशानुसार  माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक आकाश छाजेड यांच्यावर नाशिक काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या