नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कर्ज थकविल्याप्रकरणी तब्बल नऊ महिन्यापासून तुरुंगात असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे (Advay Hiray) यांची मुंबई न्यायालयाने (Mumbai Court) (दि.१२) जामीनावर (Bail) मुक्तता केली. डॉ. हिरे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून २०१२ साली मालेगाव येथील रेणूकादेवी सुतगिरणी संस्थेसाठी तीन कोटी ४० लाखांचे कर्ज घेत थकविले होते.
हे देखील वाचा : नाशिकच्या पोलिसांचा गौरव; सात अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपती पदक
या प्रकरणात हिरे यांच्याकडे बँकेचे (Bank) एकूण ३५ कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज (Loan) थकले. हे कर्ज थकविल्याप्रकरणी डॉ. हिरे यांच्यासह इतरांवर मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलीस ठाण्यात बँकेने फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात डॉ. हिरे यांना १३ नोव्हेबर २०२३ रोजी भोपाळ येथून अटक करण्यात आली होती. त्यांना १६ नोव्हेबर रोजी मालेगाव येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. व्ही. बघेले यांनी डॉ. हिरे यांना प्रारंभी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तेव्हापासून हिरे हे कोठडीतच होते.
हे देखील वाचा : PM Modi Speech : एक देश, एक निवडणूक ते महिलांची कामगिरी; मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
तर हिरे यांच्यावतीने वकिलांनी वेळोवेळी जामिनासाठी अर्ज केले होते. परंतू त्यांना जामिन नामंजूर हाेत हाेता. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) अर्ज केला. परंतु तेथे ही त्यांना दिलासा मिळत नव्हता. त्यानंतर हिरे यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार याच्या न्यायालयासमोर सुनावणी झाल्यानंतर जामिन मंजूर करण्यात आला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा