Wednesday, February 4, 2026
Homeदेश विदेश"अबकी बार मोदी सरकार", "दो बूंद जिंदगी के" जाहिरातींचे जनक, "मिले सुर...

“अबकी बार मोदी सरकार”, “दो बूंद जिंदगी के” जाहिरातींचे जनक, “मिले सुर मेरा तुम्हारा”चे रचनाकार पद्मश्री पियुष पांडेंचं निधन

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पियुष पांडे यांनी अनेक जाहिराती, गाणे लिहीले. त्यातील “मिले सूर मेरा तुम्हारा” हे गाणे लिहिले. “अबकी बार मोदी सरकार” हे घोषवाक्य सुद्धा पियुष पांडे यांच्या संकल्पनेतील आहे. पियुष पांडे यांच्या निधनाचे कारण अज्ञात आहे. अहवालानुसार ते गंभीर संसर्गाशी झुंजत होते. त्यांच्या अंत्यसंस्कार आज मुंबईत केले जातील. पियुष पांडे यांनी २०१४ मध्ये भाजपचे घोषवाक्य “अबकी बार मोदी सरकार” देखील तयार केले, जे आजही घराघरात लोकप्रिय आहे. पियुष पांडे यांनी पल्स पोलिओ जाहिरात “दो बूंदे जिंदगी की” देखील तयार केली, जी आजही लोकप्रिय आहे.

देशातील जाहिरात गुरू पद्मश्री पियुष पांडे यांचे आज (२४ ऑक्टोबर) निधन झाले. त्यांनी वयाच्या ७०व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. भारतातील जाहिरातींना एक वेगळेपण प्रदान करण्यात पांडे यांचे महत्त्वाचे योगदान होते. ओगिल्वी इंडियामध्ये त्यांनी ४० वर्षांहून अधिक काळ काम केले. पांडे यांनी अनेक गाजलेल्या आणि वर्षांनुवर्षे लोकांच्या स्मरणात राहतील, अशा जाहिराती पांडे यांनी दिल्या.

- Advertisement -

कारकिर्दीला अशी झाली सुरवात
तरूणपणी सुरुवातीला क्रिकेटपटू, टी टेस्टर आणि बांधकाम मजूर म्हणून काम केल्यानंतर पांडे यांनी १९८२ साली ओगिल्वी कंपनीत काम करण्यास सुरवात केली. २७ व्या वर्षी जाहिरात क्षेत्रात पदार्पण करत इंग्रजीचा दबदबा असलेल्या या क्षेत्रात पांडे यांनी आपल्या लेखणीने स्वतःचे वर्चस्व निर्माण केले. त्यांचे भाऊ प्रसून पांडे आणि पियुष पांडे दोघांनी मिळून दररोजच्या उत्पादनांसाठी रेडिओ जिंगल्समध्ये आवाज दिला. २०१६ मध्ये भारत सरकारने पीयूषला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय, २०२४ मध्ये त्यांना एलआयए लेजेंड पुरस्कार मिळाला.

YouTube video player

एशियन पेंट्ससाठी ‘हर खुशी मे रंग लाए’, कॅडबरीसाठी ‘कुछ खास है’, ठंडा मतलब कोका-कोला, फेविकॉल आणि हचसाठी पग श्वानाचे कॅम्पेन अशा कितीतरी उत्पादनांना कायम लक्षात राहतील, अशा जाहिराती पांडे यांनी दिल्या.

कोणकोणत्या जाहिराती पियुष पांडेंनी दिल्या?
फेविकॉल ट्रकची जाहिरात
सन २००७ मध्ये प्रदर्शित झालेली ही जाहिरातीत, एका ट्रकवर अनेक लोक बसलेले दिसतात आणि वाहनातून एकही जण न पडता एका खडबडीत रस्त्यावरून पुढे जात असतात. या जाहिरातीने ग्लूला फेविकॉलमध्ये रूपांतर केले. या जाहिरातीने असंख्य पुरस्कार जिंकले नाहीतर प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतले.

हच फोन च्या पग ची जाहिरात
२००३ साली मध्ये प्रदर्शित झाली होती. पांडे यांनी मोबाईल कनेक्टिव्हिटीला मैत्री आणि विश्वासाशी जोडले. “भाई, इट्स हॉट!” सारख्या हिंदी संवादांनी ते घराघरात लोकप्रिय झाले. या जाहिरातीमुळे ब्रँडचे पुनर्ब्रँडिंग करण्यात यश आलेच नाही तर पगला राष्ट्रीय आयकॉन बनवण्यातही यश आले.

मान्यवरांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांनी ट्विटरवर लिहिले की, “पियुष पांडे त्यांच्या सर्जनशीलतेसाठी ओळखले जात होते. त्यांनी जाहिरातीच्या जगात प्रचंड योगदान दिले. त्यांच्याशी वर्षानुवर्षे झालेल्या संवादांना मी जपून ठेवेन. त्यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना माझी श्रद्धांजली.”

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत पांडे यांना आदरांजली वाहिली. “श्री पियुष पांडे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. भारतीय जाहिरात विश्वातील ते एक महान व्यक्ती होते. दररोजच्या जीवनातील संवाद, इथल्या मातीतील विनोदाचे त्यांनी जाहिरातीमध्ये रुपांतर केले. विविध प्रसंगी त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांचे काम पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील”, असे सीतारमण म्हणाल्या.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ई-गव्हर्नस सुधारणेत महापालिका राज्यात पहिल्या दहामध्ये

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक जलद व सुरळीत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार ई- गव्हर्नस सुधारणा...