Monday, May 20, 2024
Homeभविष्यवेधसंपन्न, संवेदनशील, प्रभावशाली नीता अंबानी

संपन्न, संवेदनशील, प्रभावशाली नीता अंबानी

नीता अंबानी यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1963 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात, रवींद्रभाई दलाल आणि पूर्णिमा दलाल यांच्या घरात झाला. त्यांनी मुंबईच्या नरसी मोंजी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेचे पदवी शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांना भरतनाट्यमची आवड. त्यातच करिअरचे त्यांचे स्वप्न होते. त्या व्यावसायिक भरतनाट्यम नृत्यांगना होत्या. कलेच्या याच आवडीतून त्यांनी जगभरात सर्वोत्तम ठरलेले ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ मुंबईत उभारले आहे.

जगातिक सर्वात श्रीमंतांच्या यादीत विराजमान मुकेश अंबानी यांच्या त्या सुविद्य पत्नी. त्या शाळेत शिक्षिका असताना या दोघांची भेट झाली. पुढे 1985 मध्ये त्यांचे लग्न झाले. जगभरात पसारा असलेल्या रिलायन्स उद्योग समूहाच्या त्या फर्स्ट लेडी. सामाजिक कार्यात अग्रेसर असण्यासोबत उद्योग, कला, क्रीडा क्षेत्रात त्यांनी आपला प्रभाव निर्माण केला आहे. अनेकजण त्यांना राजघराणे नसलेली राणी मानतात. रिलायन्स फाउंडेशन, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या त्या संचालक आहेत.

- Advertisement -

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नीता दलाल यांचा विवाह मुकेश अंबानी यांच्याशी 1985 मध्ये झाला. प्रत्येक लेखातून मी नशीब या शब्दावर जोर देत आलो आहे. नशिबात असेल तर छप्पर फाडके देता है, हे वाक्य उगाच प्रचलित नाही. ध्यानीमनी नसताना नावाजलेल्या उद्योजकाच्या घरात त्यांचे लग्न जुळले. लग्नानंतर त्यांचे सर्व जगच बदलले. प्रत्येक उपवर मुलीच्या मनात राजकुमार मिळावा, ही इच्छा असते. काही नशीबवान मुलींच्याबाबत नशिबाची दारे उघडली जातात तर काही सामान्य जीवन कंठतात.

नीता यांच्या हातावरील रेषा ह्या अजब आहेत. अशा रेषा हातावरील विविध ग्रहांवर जाऊन पोहोचलेल्या मी कधीही पाहिल्या नव्हत्या. मला वाटते कि असा योग् आयुष्यात येणे मुश्किल आहे. तळ हातावरील ग्रहांची स्थिती, त्यावरील रेषा, ग्रहांचे उभार असामान्य आहेत. मानवाच्या हातावरील ग्रह रेषांचे ठिकाण, अखिल मानव जातीत सारखे असते. परंतु हातावरील ग्रह रेषांची जागा त्यांचा उगम व अस्त, रेषा प्रवासात ज्या ज्या ग्रहांवरून मार्गक्रमण करत असतात, स्पर्शून जातात किंवा पोहोचतात, त्यावेळेस ग्रहांच्या शुभ अशुभ कारकत्वात भर घालतात.

नीता अंबानी यांच्या हातावरील सर्वोत्तम ग्रहात एक नंबरला गुरू आहे. त्यानंतर अनुक्रमे शुक्र, शनी, रवी, चंद्र व मंगळ यांचा नंबर लागतो. लग्नाळू व्यक्तींचे लग्न कधी होईल याचा होरा काढण्यासाठी आधी गुरु ग्रहाची स्थिती, जन्म कुंडलीवाले तपासतात. गुरु बळात विवाह नक्की जमतात व होतात. ऐश्वर्य लाभण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रह रेषांची स्थिती नीता अंबानी यांचे हातावरून आज पहिल्या प्रथम मला उमगली. असामान्य ख्यातमान अनेक व्यक्तींच्या तळहातावरील रेषा, ग्रह चिन्हे यांचे कारकत्व पाहताना सर्वसाधारणपणे भाग्य रेषा आयुष्य रेषेतून उगम पावलेली व थेट शनी ग्रहावर जाऊन थांबलेली असते. हि एक ऐश्वर्याची खूण आहे. अर्थात सर्वच भाग्य रेषा ज्या आयुष्य रेषेतून उगम पावतात, त्या ऐश्वर्य देतात. पण त्या ऐश्वर्यात संचित आणि भाग्य, हातावरील इतर ग्रह रेषांचे अडथळे, रेषांचे पोत इत्यादी अनेक घटक तपासावे लागतात.

भाग्य रेषेचा उगम हा आयुष्य रेषेतून होताना तो आयुष्य रेषेच्या मध्यापासून होत असेल तर साधारण संपन्नता असते. आयुष्य रेषेतून आयुष्य रेषा मनगटाकडे जाताना मनगटाजवळ, मनगटापासून अथवा थोड्या वरच्या बाजूने आयुष्यरेषेतून भाग्य रेषेचा उगम होत असे तर हे लोक अति श्रीमंत होतात. अमिताभ बच्चन यांच्या हातावरील भाग्य रेषा मनगटाचे जवळ आयुष्य रेषेच्या समाप्तीच्या आधी उगम पावत असून ती थेट शनी ग्रहावर जाऊन थांबल्याने अमिताभ यांचेकडे ऐश्वर्य आहे. येथे भाग्य रेषेचा पोतही महत्वाची भूमिका पार पाडते. भाग्य रेषा जितकी पातळ, तलम, चमकदार, अखंड, सरळ शनी बोटाकडे व शनी ग्रहावर जाईल, तितकी ती संपन्नेत अधिक भर घालीत असते. नीता यांच्या हातावर शुक्र बुध युतीचा योग् झाला आहे. हातावरील शुक्र ग्रहाचा उभारा नंतर मणिबंधाचे जवळ अंगठ्याच्या बाजूने शुक्र ग्रह समाप्तीनंतर एक ठळक गोलाकार रेषा थेट बुध ग्रहावर जाऊन थांबली आहे. ही शुक्र-बुध युतीची रेषा अखंडपणे बुध ग्रहाच्या कडेला, रवी बोटाच्या अलीकडे जाऊन थांबली आहे. शुक्र ग्रहाचे ऐश्वर्य व शुभ बुध ग्रहाचे कारकत्व लाभल्याने, व्यापारात जिथे जिथे नीता यांची भागीदारी आहे किंवा त्या लाभार्थी आहेत, त्या प्रत्येक कंपनीत नफ्याचे प्रमाण मोठे राहणार आहे. रग्गड नफा मिळत राहणार आहे. शुक्र-बुध युतीमधे रवी ग्रहाचे कारकत्व सम्मिलीत आहे. कारण, बुध ग्रहावरची शुक्र ग्रहाकडून आलेली अखंड रेषा रवी ग्रहाच्या सीमेवर म्हणजेच चौथा व तिसर्‍या बोटाच्या मध्ये जाऊन थांबली असल्याने, ऐश्वर्य तर लाभलेच शिवाय, रवी ग्रहाच्या कारकत्वाचा, सन्मान, कीर्ती प्रसिद्धीचा लाभ नीता यांना झाला आहे. या मानसन्मानाचे मोठे फलित म्हणजे, नीता यांना ऑलिंपिक संघटनेचे सदस्यत्व 2016 साली जागतिक ऑलिम्पिक संघटनेने बहाल केले. त्या भारतातून ऑलिम्पिक संघटनेच्या एकमेव प्रतिनिधी आहेत. इंडियन प्रिमियर लीगचे सर्वाधिक वेळा अजिंक्यपद जिंकणार्‍या मुंबई इंडियन्स संघासह अमेरिका, संयुक्त अमिरात व दक्षिण आफ्रिकेत मुंबई इंडियन्सच्या नावाचे लीग क्रिकेट खेळणार्‍या संघांची मालकी त्यांच्याकडे आहे. यासोबत फुटबॉल व अन्य खेळांच्या लीग टीमकडेही त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे.

नीता यांच्या हातावर शुक्र बुध युतीचा योग् झाला आहे. या योगात चंद्र ग्रहाची शुक्र ग्रहाला साथ आहे. चंद्र ग्रहावर मनगटाच्या बाजूने चंद्र प्रभावी एक रेषा उगम पावते आहे व ती शुक्र-बुध रेषेत जाऊन मिळाली आहे. या शुक्र बुध रेषेला, चंद्र व रवी ग्रहाचे शुभ कारकत्व लाभल्याने शुक्र, बुध, चंद्र व रवी या चार ग्रहांच्या योगाचे शुभ फल नीता यांना मिळाले आहे. नीता यांच्या हातावरील आयुष्य रेषा खणखणीत असल्याने त्यांची प्रकृती निरोगी राहणार आहे. तसेच या आयुष्य रेषेसोबत मंगळ रेषा हातावर, आयुष्य रेषेच्या आत थेट मनगटापर्यंत असल्याने नीता यांना अधिक कामाचा उत्साह आयुष्यभर लाभणार आहे. हि मंगळ रेषा क्रोधाची कारक आहे. नीता यांचा नक्कीच राग अनावर होत असणार आहे. या मंगळ रेषेनेच नीता यांना भरतनाट्यम नृत्य प्रकारात अथक मेहेनत घेण्याची शक्ती दिली. मस्तक रेषा व आयुष्य रेषा नीता यांच्या हातावर उगमस्थानी बारा वर्षांपर्यंत एकत्र आहेत. त्यानंतर त्या स्वतंत्र झाल्या आहेत. मस्तक रेषा हातावर चंद्र ग्रहावर बाकदार होऊन उतरली आहे. ही मस्तक रेषा बुद्धिमत्ता, हुशारी व कल्पकता देत आहे. चंद्र ग्रह, शुक्र ग्रहापेक्षा मनगटाकडे अधिक खाली सरकून फुगीर झाल्याने नीता यांचेकडील विद्वत्तेत व कल्पनाशक्तीत त्याने भर घातली आहे.

नीता यांचे हातावर हृदय रेषा दोन आहेत. मस्तक रेषेच्या वरची हृदय रेषा शनी ग्रहाच्या खाली थांबली आहे. दुसरी रवी ग्रहांपासून उगम पावून ती शनी व गुरूच्या बोटांपर्यंत जाऊन रुतली आहे. शनी ग्रहावर जाऊन थांबलेली हृदय रेषा ऐहिक सुखाची आहे व गुरु-शनीच्या दोन बोटांच्या मध्ये जाऊन थांबलेली हृदय रेषा अत्यंत व्यवहारी गुणांची आहे. विवाह रेषा हृदय रेषेकडे बाक घेऊन खाली वळाली असल्याने नीता व त्यांच्या पतीच्या विचारांमध्ये मतभेद कायम स्वरूपी राहणार आहेत. शनी व गुरु ग्रहांच्या बोटांच्या पेर्‍यात गेलेल्या हृदय रेषेने शनी व रवी ग्रह यांचा आकार कमी केला असला तरी, शनी रवी ग्रहाचा एकत्रित उभार आहे. त्यामुळे शनी व रवी ग्रह एकमेकात सम्मिलीत झाले आहे. रवी- शनी ग्रह एकत्रित असल्याने व त्यांचा हातावरील उभारही मोठा झाल्याने या दोनही ग्रहांनी नीता यांना शुभ कारकत्व बहाल करताना शनी ग्रहाने प्रचंड स्थावर मालमत्ता दिली आहे. रवी ग्रह शनी ग्रहापेक्षा आकाराने मोठा असल्याने त्यांना प्रसिद्धी दिली आहे. त्या मीडियात कायम चर्चेत असतात. करोडो रुपयांची आभूषणे असो, त्यांची पर्स, त्यांचा पेहवराव याची कायम चर्चा होते. नीता यांना कौतुक झालेले आवडते. त्या फॅशन आयकॉन ठरल्या, यास कारणीभूत आहे फुगीर रवी ग्रह! हातावरील बोटे बोथट आकाराची व लांब नाहीत. बोटे टोकाला बोथट असल्याने त्यांचा स्वभाव शांततापूर्वक विचाराअंती निर्णय घेण्याचा आहे. अंगठ्यावरील पहिले पेर मोठे आहे. त्यामुळे त्यांचे कल्पनाविश्व मोठे आहे. दुसरे प्रमाणात असले तरी त्यावर एक आडवी रेषा आल्याने त्यांना निर्णयाची थोडी घाई होते.

गुरु ग्रहावर आजपर्यंत मी कधीही न पाहिलेल्या उभ्या रेषा आहेत. पहिल्या बोटाखाली असलेल्या या स्वतंत्र उभ्या रेषा गुरु ग्रहाला अत्यंत शुभदायी फळ देत आहेत. यात खालच्या दोन नंबरच्या हृदय रेषेची आणखी एक छोटी स्वतंत्र रेषा गुरु ग्रहावर तिसर्‍या पेर्‍याच्या खाली जाऊन थांबली आहे. हि छोटी हृदय रेषा, नीता यांना समाजातील वंचितांसाठी कल्याणासाठी यथाशक्ती धन खर्च करावयास लावते आहे. आर्थिक क्षमता नसलेल्या विशेषतः कुमारवयीन मुलांसाठी त्या निरनिराळ्या योजना राबवित आहेत. भाग्य रेषेचा एक फाटा गुरू ग्रहावर गेल्याने त्या सामाजिक, धार्मिक कामात पुढे आहेत. मस्तक रेषेतून एक रेषेचा फाटा गुरू ग्रहावर गेल्याने त्या संवेदनशील आहेत. आयुष्य रेषेतून सुरुवातीला वयाच्या 12 व्या वर्षी उत्कर्ष रेषा गुरू ग्रहावर गेली आहे. या काळात त्यांनी भरनाट्यममध्ये नाव कमावले. वयाच्या 22 व्या वर्षी आणखी एक जबरदस्त उत्कर्ष रेषा गुरु ग्रहावर गुरु ग्रहाच्या मधोमध गेल्याने तो उत्कर्ष त्यांच्या आयुष्यातील कमी वयात अत्यंत मोठा होता. कारण त्या वर्षी नीता यांचे मुकेश अंबानी यांच्याशी लग्न झाले. गुरु ग्रहावर एकूण पाच उभ्या रेषा आहेत. या रेषा अनन्यसाधारण आहेत. या रेषांनीच त्यांच्या आयुष्याला 22 व्या वर्षी निर्णायक कलाटणी देत उत्कर्ष घडवून आणला.

- Advertisment -

ताज्या बातम्या