दिल्ली | Delhi
वीस वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या सैनिकांनी (US troops) माघार घेतल्याने संपूर्ण अफगाणिस्तानावर (Afghanistan) तालिबानचे (Taliban) वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
अफगाणिस्तानची सत्ता हस्तगस्त करणारे तालिबान आहे तरी काय?
तालिबान्यांनी (taliban news) अफगाणिस्तानमध्ये (afghanistan news) ताबा मिळवल्यानंतर आता तेथून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. अनेकांनी काबूल मधील विमानतळावर मोठी गर्दी केली आहे. सध्या त्याचे व्हिडीओ (afghanistan video) सोशल मीडीया (Social media) मध्ये व्हायरल होत आहेत.
काबूल इंटरनॅशनल एयरपोर्टवर (Kabul International Airport) आता कमर्शियल फ्लाइट्सची (Flights) उड्डाण थांबवण्यात आलीत. विमानतळावर गोळीबार होत आहे. मोठ्या संख्येनं नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता विमानांची उड्डाण थांबवण्यात आल्यानं नागरिक आतमध्येच अडकून बसले आहेत.
हमीद करझाई विमानतळावरुन व्यावसायिक, प्रवासी विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. विमानतळावर लुटमार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काबूल विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. अफगाणिस्तानची हवाई हद्द टाळण्यासाठी एअर इंडियाचे (Air India) शिकागो-दिल्ली विमानाचा मार्ग बदलण्यात आला आहे. मार्ग बदलण्यात आलेल्या दिल्लीला येणाऱ्या या विमानात यूएई (UAE) किंवा दोहा विमानतळावर इंधन भरण्यात येईल.