Tuesday, May 28, 2024
Homeदेश विदेशAfghanistan Taliban Crisis : तालिबान्यांनी केली पत्रकाराची हत्या?; अखेर सत्य आले समोर

Afghanistan Taliban Crisis : तालिबान्यांनी केली पत्रकाराची हत्या?; अखेर सत्य आले समोर

दिल्ली | Delhi

तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती गंभीर आहे. अशातच तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराची हत्या केल्याची बातमी समोर आली होती.

- Advertisement -

पण या पत्रकाराने थोड्याच वेळात ट्विटरवरुन खुलासा करत आपल्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचे म्हटलं असून आपले प्राण वाचल्याचे स्पष्ट केले आहे.

या मारहाणीसंदर्भात सर्वात आधी त्या वृत्तवाहिनीने माहिती दिली आणि त्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्तांकन केल्यानंतर या पत्रकाराचे ट्विट समोर आले आणि तो जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पत्रकाराला देशाची राजधानी असणाऱ्या काबूलमध्ये मारहाण झाली.

जिआर खान याद असं मारहाण करण्यात आलेल्या पत्रकाराचं नाव आहे. जिआर हे काबूलमधील बेरोजगारी, गरीबी आणि दारिद्र्य या विषयावर वृत्तांकन करत होते. त्यावेळी तालिबान्यांनी त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली.

जियार खान याद यांनी सांगितले की, आम्ही फुटेज घेत असताना काही तालिबानी लोक आले आणि त्यांनी कोणतीही चौकशी न करता मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याने मोबाईल फोन आणि कॅमेरामनचा कॅमेरा हिसकावला. मीडिया व्यक्ती असल्याचे पुरावे सादर केले आणि ओळखपत्रेही दाखवली, पण तालिबानी अतिरेक्यांनी त्याला थप्पड मारणे आणि बंदुकीच्या बुटांनी मारणे सुरू केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या