Saturday, April 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजगृहमंत्री अमित शहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना आदेश; महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांबाबत धक्कादायक माहिती आली...

गृहमंत्री अमित शहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना आदेश; महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांबाबत धक्कादायक माहिती आली समोर

मुंबई | Mumbai
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम मधल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाकडून अनेक कारवाई सुरू करण्यात आली असून दहशतवाद्यांचा ठाव ठिकाणा शोधण्याचे कार्य युध्दपातळीवर सुरु आहे. या कारवाईनंतर पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली असून भारतात राहणाऱ्या पाकिस्तानींना देश सोडण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच त्यांना ४८ तासांचा अल्टीमेटमही देण्यात आला.

यासोबतच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये, याची खात्री करावी. सोबतच पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा, असे निर्देश दिले आहेत. अमित शाहांच्या या निर्णयानंतर राज्यातील पाकिस्तानी नागरिकांच्याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर आली आहे. अल्पकालीन व्हिजा म्हणजेच शॉर्ट टर्म व्हिसा असलेले एकूण ५५ पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहत असल्याची माहिती मिळत आहे. भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, समोर आलेल्या अकडेवाडीनुसार, एकट्या नागपूर शहरात सर्वाधिक २ हजार ४५८ पाकिस्तानी आढळले असून ठाणे शहरात ११०६ पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. तर मुंबईत १४ पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील फक्त ५१ पाकिस्तान्यांकडे वैध कागदपत्रे मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात आलेले १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचे आढळून आले आहे. १०७ पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाही.

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी?
1) अकोला – 22
2 अहिल्यानगर -14
3 अमरावती – 117
4 अमरावती – 1
5 छत्रपती संभाजीनगर – 58
6 छत्रपती संभाजीनगर – 1
7 छत्रपती संभाजीनगर – 0
8 भंडारा – 0
9 बीड – 0
10 बुलढाणा – 7
11 चंद्रपूर – 0
6 धुळे – 6
13 धारशिव – 0
14 गडचिरोली- 0
15 गोंदिया – 5
16 हिंगोली – 0
17 जळगाव – 393
18 जालना – 5
19 कोल्हापूर – 58
20 लातूर – 8
21 मुंबई (MUMBAI RLY)- 2
22 मुंबई (MBVV)- 26
23 नाशिक (NASHIK C)- 8
24 नाशिक (NASHIK R)- 2
25 नागपूर (NAGPUR C)- 2458
26 नागपूर (NAGPUR R)- 0
27 नागपूर (NAGPUR RL)Y 0
28 नांदेड-4
29 नंदुरबार-10
30 नवी मुंबई-239
31 परभणी-3
32 पालघर-1
33 पिंपरी चिंचवड-290
34 पुणे-114
35 पुणे (PUNE R) -0
36 पुणे (PUNE RLY)- 0
37 रायगड-17
38 रत्नागिरी-4
39 सातारा-1
40 सांगली-6
41 कोल्हापूर (SOLAPUR C)-17
42 सोलापूर (SOLAPUR R)-0
43 सिंधुदुर्ग-0
44 ठाणे (THANE C)-1106
45 ठाणे (THANE R)-0
46 वर्धा-0
47 वाशिम-6
48 यवतमाळ-14
एकूण -5023

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पहलगाम

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याप्रकरणी TRF संघटनेचा घुमजाव; आधी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही...