Tuesday, July 16, 2024
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी : राज्याच्या बारावीच्या परीक्षेचा दोन दिवसांत निर्णय

मोठी बातमी : राज्याच्या बारावीच्या परीक्षेचा दोन दिवसांत निर्णय

मुंबई

- Advertisement -

सीबीएसई (CBSE )बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात मंगळवारी घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर राज्यातील बारावी बोर्डाची (HSC) परीक्षेसंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

SSC Exam : परीक्षा घेण्याच्या मागणीवर न्यायालयाचा आता या तारखेला निर्णय

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन दिवसात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रस्ताव येईल. त्यानंतर राज्याचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत परीक्षा घेऊ नये, यावर एकमत झाले. परंतु निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रस्ताव आल्यानंतर घेण्यात येणार आहे.

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा देखील करोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्याची मागणी केली गेली होती. यापूर्वी २३ मे रोजी केंद्रीय शिक्षण विभागाने यासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत विविध राज्यातील शिक्षणमंत्र्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर १ जून रोजी CBSE व ICSE मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या.

मूल्यमापन कसे होणार?

परीक्षा होणार नसल्यामुळे आता 12वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्‍न निर्माण होणार असून त्यासंदर्भात सीबीएसई निश्‍चित अशा मानकांच्या आधारे नियोजित वेळ ठरवून त्यानुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करेल, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. यासोबतच, गेल्या वर्षीप्रमाणेच याहीवर्षी ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल, त्यांना जेव्हा परिस्थिती सामान्य होईल, तेव्हा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, असं देखील सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या