Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्याराजकीय वर्तुळात खळबळ! छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ धनजंय मुंडेंनाही धमकीचा फोन

राजकीय वर्तुळात खळबळ! छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ धनजंय मुंडेंनाही धमकीचा फोन

मुंबई | Mumbai

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यापाठोपाठ शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील (Shinde – Fadnavis – Pawar Government) आणखी एका मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

- Advertisement -

नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) आली आहे. विशेष म्हणजे धमकी देणाऱ्या व्यक्तीनं त्यांच्याकडं ५० लाख रुपयांची मागणी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. भुजबळ यांना धमकी देणाऱ्याची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी धक्कादायक खुलासा आरोपीने केला आहे. आरोपीने पोलिसांच्या चौकशीत दिलेल्या माहितीनुसार फक्त छगन भुजबळच नाही तर आणखी काही बड्या नेते रडारवर होते. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं नाव प्रशांत पाटील असून, तो कोल्हापूरच्या चंदगड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

“आपल्या देशातील नेते अशिक्षित, ज्यांच्याकडे…”; अभिनेत्री काजोलचं विधान चर्चेत

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रशांत पाटीलनं मंत्री छगन भुजबळांना धमकी दिल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याचंही प्राथमिक तपासात समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांना धमकी देणारा आणि धनंजय मुंडे यांना धमकी देणारा एकच व्यक्ती असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

VIDEO : “…पण परत असं केलंत, तर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही”; प्रसार लाड यांनी अरविंद सावंतांना दिली थेट ‘वॉर्निंग’

- Advertisment -

ताज्या बातम्या