Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाAmbati Rayudu : माजी क्रिकेटर अंबाती रायडू राजकारणात आजमावणार नशीब? ‘या’ पक्षात...

Ambati Rayudu : माजी क्रिकेटर अंबाती रायडू राजकारणात आजमावणार नशीब? ‘या’ पक्षात करणार प्रवेश?

दिल्ली | Delhi

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू (Amabti Rayudu) हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, त्याने विश्वचषक २०१९ स्पर्धेदरम्यान त्याच्यासोबत झालेल्या अन्यायामागे बीसीसीआयचे धक्कादायक गुपीत सांगितले आहे. रायुडूने बीसीसीआय आणि भारतीय संघाच्या निवडकर्त्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत.

- Advertisement -

त्यानंतर आता अंबाती रायडू आता राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरू आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या वायसआर काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. रायडूने मुख्यमंत्री रेड्डी यांची एकदा नव्हे तर दोनदा भेट घेतली आहे. त्यामुळे रायडू राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अंबाती रायडू आंध्र प्रदेशातील कृष्ण किंवा गुंटूर जिलह्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. यासाठी त्याने वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांची दोनदा भेट घेतली आहे.

संगमनेरात ‘लव जिहाद’चा प्रयत्न फसला

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा अंतिम सामना हा चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज अंबाती रायडूच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. अंतिम सामन्यात अंबाती रायडूची विस्फोटक खेळी पाहायला मिळाली. त्याने ८ चेंडूत २३७.५०च्या स्ट्राईक रेटने १९ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले. या सामन्यापूर्वी रायुडूने ट्वीट करून निवृत्ती जाहीर केली होती.

Ameesha Patel : अमिषा पटेलवर आली तोंड लपवण्याची वेळ, जाणून घ्या नेमकं प्रकरण

अंबाती रायुडूने २०१० मध्ये आयपीएल करिअरला सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त अंबाती रायडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे. रायुडू (Amabti Rayudu) 2018 पासून CSK कडून खेळत आहे. रायडूने आयपीएलमध्ये २०४ सामन्यांत २८.२३ च्या सरासरीने ४३४८ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, रायुडूने आयपीएलमध्ये २२ अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे. त्याचवेळी, अंबाती रायडू हा ६ वेळा आयपीएल जिंकणाऱ्या संघाचा भाग होता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या