Saturday, May 4, 2024
Homeजळगावचाळीसगावात चार महिन्यानतंर गुरांचा बाजार गजबजला

चाळीसगावात चार महिन्यानतंर गुरांचा बाजार गजबजला

चाळीसगाव – प्रतिनिधी Chalisgoan

चाळीसगाव कृषी उत्पन्न समितीत भरणारा गुरांचा बाजार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च पासून बंद होता, हा बाजार शनिवारी लॉकडाऊन नतंर तब्बल चार महिन्यानतंर शनिवारी पुन्हा भरला. या बाजारनतंर पुढील आठोड्यानतंर पोळ सण येणार असल्यामुळे लॉकडाऊनच्यानतंर पहिल्याच बाजारात गुरे घेण्यासाठी शेतकरी-व्यापार्‍यांची तुरळक दिसून आली.

- Advertisement -

कोरोनाबाबतचे नियामाचे पालन करुन कृउबातर्फे बाजार भरविण्यात आला होता. बाजारात येणार्‍या प्रत्येक शेतकरी व व्यापार्‍यांची नोंद करुन, त्यांचे हात कर्मचार्‍यांकडून सॅनिटराईझ केले जात होते. तसेच बाजारात सोशल डिस्टींग पाळण्याच्या सूचना प्रत्येकाला दिल्या जात होत्या. पहिल्याच बाजार असल्यामुळे जवळपास १०० जनावरांची खरेदी-विक्री झाली. यात बैल, गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या आदिचा समावेश होता. खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार हे सोशल डिस्टींग ठेवूनच करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या