Friday, December 6, 2024
Homeमुख्य बातम्यानवनीत राणांविरोधात काँग्रेस आक्रमक; निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी

नवनीत राणांविरोधात काँग्रेस आक्रमक; निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी

अमरावती | Amravati

कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यातील वाद चांगलाच तापल्याचे दिसून येत आहे. यशोमती ठाकूर यांनी रवी राणा (Ravi Rana) यांच्याकडून पैसे घेतले. मात्र प्रचार दुसऱ्याचा केला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता.

- Advertisement -

यावर यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात १०० कोटींच्या अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता काँग्रेसच्या (Congress) अनुसूचित जातीच्या जिल्हाक्षांकडून नवनीत राणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Sanjay Raut : ‘ठाकरे गट नाही, शिवसेना’, सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळणार; संजय राऊतांना खात्री

नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपाची निवडणूक आयोगाने (Election Commission) सखोल चौकशी करावी, यशोमती ठाकूर यांना नवनीत राणा यांनी जे पैसे दिले, त्याचा हिशोब निवडणूक आयोगाकडे दिला का? याचीही सखोल चौकशी करावी. तसेच नवनीत राणा यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Aditya-L1 कडून वैज्ञानिक डेटा गोळा करायला सुरुवात, ISRO ची माहिती

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या