नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उध्वस्त केले त्यासोबत पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांवर ही हल्ले केले. पण भारताच्या या हल्याने थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानने तरीसुद्धा आपल्या कुरापती थांबवल्या नाही. पाकिस्तानने भारताताली सीमा भागांना लक्ष करत ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. जम्मू-काश्मीर, गुजरात आणि पंजाबमधील शहरांना लक्ष्य करायचे होते. मात्र, त्यांची प्रत्येक योजना उधळून लावली गेली. आता भारतीय सैन्याने सुवर्ण मंदिर आणि अमृतसर शहराचे संरक्षण कसे केले, हे सगळ्यांना व्हिडीओमधून दाखवले आहे.
भारतीय लष्कराच्या माहितीनुसार भारताने पाकिस्तानचा मोठा कट उधळला. पाकिस्तानच्या निशाण्यावर अमृतसरचे सुवर्णमंदिर होते. ६ आणि ७ मे रोजी पाक सैन्याने सुवर्णमंदिराला लक्ष्य करीत तेथे हल्ला करण्याचा कट रचला. मात्र भारतीय सैन्याने हा डाव उधळून लावला. भारतीय सैन्याने आकाश क्षेपणास्त्र प्रणालीद्वारे हा कट उधळला. इतकेच नव्हे, तर यादरम्यान पाकिस्तानी क्षेपणास्त्रही पाडल्याची माहिती उघड करण्यात आली.
#WATCH | Amritsar, Punjab: Indian Army shows a demo of how Indian Air Defence systems, including the upgraded L-70 Air Defence Guns, saved the Golden Temple in Amritsar and cities of Punjab from Pakistani missile and drone attacks. pic.twitter.com/acej4SgL3v
— ANI (@ANI) May 19, 2025
अमृतसर येथे भारतीय सैन्याने आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, एल-७० हवाई संरक्षण तोफा यासह भारतीय हवाई संरक्षण प्रणालींनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि पंजाबमधील शहरांचे पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षण कसे केले याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानने डागलेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष देखील दाखवले, जे भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने अडवले आणि पाडले.
#WATCH | Amritsar, Punjab: Indian Army shows a demo of how Indian Air Defence systems, including AKASH missile system, saved the Golden Temple in Amritsar and cities of Punjab from Pakistani missile and drone attacks. pic.twitter.com/3HchX0yHJI
— ANI (@ANI) May 19, 2025
15 इन्फेंट्री डिवीजनचे जीओसी मेजर जनरल कार्तिक सी. शेषाद्री यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘पाकिस्तानी सैन्याने काही लक्ष्य निश्चित केले नसतानाही भारतीय सैन्याने अचूक तर्क लावत सैन्यतळ आणि धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवली. यामध्ये सुवर्णमंदिर अतिशय महत्त्वाचे धार्मिक स्थळ ठरले. ज्यामुळे सुवर्ण मंदिराला पूर्णत: हवाई सुरक्षा कवच देण्याच्या हेतूने आम्ही अत्याधुनिक शस्त्रांची व्यवस्था केली. ८ मे रोजी पहाट होतच होती तितक्यात पाकिस्तानच्या दिशेने मानवरहित हवाई हल्ला होत असल्याचे लक्षात आले. यामध्ये मुख्यत्वे ड्रोन आणि लांबवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.’
How India's Air Defence system thwarted Pakistan's attempt to target Amritsar's Golden Temple on May 8
Read @ANI Story | https://t.co/StjLI9RA2O#India #Pakistan #GoldenTemple #Amritsar #airdefence pic.twitter.com/MdLlhWLpZe
— ANI Digital (@ani_digital) May 19, 2025
पुढे ते म्हणाले की , “आम्हाला या हल्ल्याची अपेक्षा होती, त्या दृष्टीने आम्ही पूर्णपणे तयार होतो. आमच्या धाडसी आणि सतर्क आर्मी एअर डिफेन्स गनर्सनी पाकिस्तानी सैन्याचे नापाक हेतू हाणून पाडले आणि सुवर्ण मंदिरावर लक्ष्य केलेले सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली. अशाप्रकारे आपल्या पवित्र सुवर्ण मंदिरावर एकही ओरखडा येऊ दिला नाही.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा