Thursday, May 1, 2025
Homeधुळेबलात्कारानंतर पेट्रोल टाकून महिलेला पेटविले : संशयित अटकेत

बलात्कारानंतर पेट्रोल टाकून महिलेला पेटविले : संशयित अटकेत

धुळे । dhule । प्रतिनिधी

शहरातील पारोळा रोडवरील कृषी विद्यालयाच्या नाल्याजवळ सोनगीर येथील महिलेवर (woman) बलात्कार (rape) करण्यात आला. त्यानंतर हातपाय बांधून अंगावर पेट्रोल (pouring petrol) टाकून तिला पेटवून (fire) दिले ही धक्कादायक घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या जबाबावरून धुळ्यातील एकाविरूध्द आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

- Advertisement -

याबाबत सोनगीर येथे राहणार्‍या 37 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवार दि.21 मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास बाळू यादव चंद (रा. धुळे) हा संशयित आरोपीने पीडित महिलेला पारोळा रोडवरील नाल्याजवळ घेवून जावून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच तिचे हातपाय बांधून ठेवले. त्यानंतर दि. 22 रोजी मध्यरात्री दीड ते सव्वा दोन वाजेदरम्यान तिच्या अंगावर दुचाकीतील पेट्रोल टाकून आगपेटी काढून तिला जीवे ठार मारण्याउद्देशाने पेटवून दिले. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या लेखी जबाबावरून आझादनगर पोलिस ठाण्यात बाळू यादव चंद याच्याविरूध्द भांदवि 307, 376, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

India vs Pakistan War : भारताची पाकला तंबी; नियंत्रण रेषेवर युद्धबंदी...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi  भारत आणि पाकिस्तानच्या (India vs Pakistan War) लष्करी महासंचालकांनी ऑपरेशन्सच्या हॉटलाईनवर चर्चा केली आणि पाकिस्तानकडून होणाऱ्या युद्धबंदी उल्लंघनांवर...