जळगाव –
केंन्द्र शासनाने दोनही सभागृहात एनआरसी व सीएबी कायदा ससदेत पारीत केला. सद्यस्थितीत देशभरात धर्मनिरपेक्ष विचाारधारेच्या पक्षांची भुमिका या महत्वाची असून या सरकारने निर्माण केलेल्या वातावरणाना जातीयतेचा रंग न देण्याची जबाबदारी धर्मनिरपेक्ष पक्षांवर आहे, हा लढा कोणा एका गटाविरूद्ध नाही तर केवळ एका घटकाला समोर ठेवून भारतीय संविधानावर हा हल्ला आहे.
याच्या विरोध म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्यने जिल्हा मुस्लिम मंच, बहुजन क्रांती मोर्चा, बामसेफ,काँग्रेस, राष्ट्रवादी,एमआएम,समाजवादी, रिपब्लिकन पक्षांसह अन्य विविध धार्मिक सामाजिक शेक्षणिक क्रिडा क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यानी धरणे आंदोलन करून प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी एनआरसी व सीएबी कायदा लागू करण्यात येवू नये या भुमिकेच्या केंंन्द्र शासनाच्या विरोधात संदर्भात विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परीसर दणाणून गेला होता.
यावेळी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, या कायदयानुसार मुलभुत अधिकारांचे हनन होत असून केंन्द्र शासनाच्या विरोधात प्रदर्शन करणार्याविरूद्ध पोलिस कारवाइचा निषेध करण्यात येत आहे. तसेच जामिय मिलीय विद्वापिठ, दिल्ली, अलिगढ, मुस्लिम युनिवर्सीटी, नदवा कॉलेज, लखनौ तसेच अन्य महाविद्यालयात छात्रालय खाली करून घेण्यात येत आहेत, विद्यार्थ्यांवर पोलिस प्रशासनाकडून अन्याय केला जात आहे.
या घटनेचा निषेध करीत आज जिल्हास्तरावर मुख्यालयावर धरणे करण्यात आले तर शुक्रवार दि.3 जानेवारी 2020रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन, रॅली तर 30 जानेवारी रोजी भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे, असे बहुजन क्रांती मोर्चातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकता कायद्याविरुद्ध शुक्रवारी समस्त मुस्लिम समाज एकवट ला होता .जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात हजारोच्या संख्येने धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या वेळी जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून एन आर सी रद्द करण्याचा घोषणा देण्यात आल्या .मोर्चा धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने जनसमुदाय सहभागी झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता.सकाळी अकरा वाजेपासून पासूनच परिसरात मोठ्या प्रमाणात सर्वधर्मिय कार्यकर्ते एकवटल्याने दुपारपासून गर्दी वाढू लागल्यानंतर आकाशवाणी चौक ते स्वतंत्र चौक हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
तब्बल 3 तासापेक्षा अधिक काळ हा रस्ता बंद होता. दरम्यान मोर्चाचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत झाल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.
यावेळी राज्य अध्यक्षा प्रतिभा उबाळे, जिल्हाध्यक्ष राजू खरे, सुनिल देहेडे, अ.गफ्फार मलिक, अ.करीम सालार, मुफती हारून नक्वी,डॉ.अमान, बशीर बुरहानी,मजील शेख, फिरोज मुलतानी,जाकीर पठान, अलफैज पटेल,जमील देशपांडे, मोहन शिंदे, डॉ.शाकिर,रईस बागवान,अशफाक पिंजारी,अजमल शाह,हमीद शेख,हारून मन्सुरी,हाफीज फिरोज, विजय सुरवाडे, निलुताई इंगळे, मुकेश सावकारे, बबलु पेंढारकर, धर्मराज सपकाळे, अकरम देशमुख, राधे शिरसाठ, शालू यादव, विनोद रंधे, बामसेफचे अहिरे, सानेवणे उपस्थित होते.