Thursday, June 13, 2024
Homeनगरजर अगस्ती बंद पडला तर भविष्यात पुन्हा कारखाना सुरू होणार नाही -...

जर अगस्ती बंद पडला तर भविष्यात पुन्हा कारखाना सुरू होणार नाही – गायकर

अकोले |प्रतिनिधी| Akole

- Advertisement -

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत चालू हंगाम सुरू केला असून एफ.आर.पी पेक्षा 28 रुपये जादा दर देत 2500 रुपये टन भाव देऊन एफ.आर.पी.चे 200 रुपये प्रमाणे अगस्ती कारखान्याने शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. शेजारच्या कारखान्यापेक्षा थोडा भाव कमी दिला असला तरी ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी वेगळा निर्णय घेऊ नये. अगस्ती कारखाना जर बंद पडला तर भविष्यात पुन्हा तालुक्यात कारखाना सुरू होणार नाही,अशी भावना कारखान्याचे चेअरमन सिताराम गायकर यांनी व्यक्त केली.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या 2023-24 गळीत हंगामाचा शुभारंभ त्यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी श्री.गायकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संचालक रामनाथ वाकचौरे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी विधिवत पूजन केले. याप्रसंगी सातारा येथील उद्योजक नितीन शिंदे, कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीमती सुनीताताई भांगरे, कॉ.कारभारी उगले, विजयराव वाकचौरे, अ‍ॅड. वसंतराव मनकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे, शिवसेना ताप्रमुख डॉ.मनोज मोरे, भाऊपाटील नवले, मारुती मेंगाळ, गिरजाजी जाधव, बाळासाहेब नाईकवाडी, प्रकाश मालुंजकर, विठ्ठलराव चासकर, मच्छिंद्र मालुंजकर, भानुदास तिकांडे, डॉ.संदीप कडलग, महेश नवले, बाळासाहेब देशमुख, अप्पासाहेब आवारी, बाळासाहेब ताजणे, आनंदराव वाकचौरे, किसनराव पोखरकर, सुरेश नवले, सुशांत आरोटे, चंद्रभान नेहे, अरुण रुपवते, अनिल कोळपकर, नवनाथ शेटे,भाग्यश्री आवारी, नितीन नाईकवाडी, पांडुरंग नवले, डॉ. रामहरी चौधरी, रामहरी तिकांडे, सदानंद पोखरकर, प्रमोद मंडलिक, रामनाथ शिंदे, भाऊसाहेब रकटे, सयाजी पोखरकर आदींसह कार्यकारी संचालक सुधीर कापडणीस उपस्थित होते. यावेळी कॉ. कारभारी उगले, पांडुरंग नवले, मीनानाथ पांडे, प्रकाश मालुंजकर, भाऊपाटील नवले, महेशराव नवले, चंद्रकांत नेहे, उपाध्यक्ष श्रीमती सुनीताताई भांगरे, अ‍ॅड.वसंत मनकर, विजयराव वाकचौरे, सुरेश नवले यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे, यमाजी लहामटे, पर्बतराव नाईकवाडी, अशोक आरोटे, अशोकराव देशमुख, मच्छिंद्र धुमाळ, कैलासराव शेळके, पाटिलबुवा सावंत, विकास शेटे, मनोज देशमुख, विक्रम नवले, प्रदीप हासे, सुधीर शेळके, बादशहा बोंबले, सचिन दराडे, सौ.सुलोचना नवले, सौ.शांताराम वाकचौरे, तज्ञ संचालक विलास नवले, सदाशिव साबळे व सर्व अधिकारी कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव शेटे व विश्वास ढगे यांनी तर आभार संचालक विकास शेटे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या