नाशिक। प्रतिनिधी Nashik
हाताला कामधंदाच मिळत नसल्याने बांग्लादेशातून ‘डंकी रुट’ मार्गे नाशिकमध्ये आलेल्या चार बांग्लादेशी विवाहित महिलांसह एजंटला शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकने रविवारी(दि.२०) पहाटे गजाआड केले आहे. विशेष म्हणजे एजंटांच्या साखळीद्वारे या महिला पंचवटी पोलिसांच्या हद्दीतील अमृतधाम परिसरातील मळ्यात प्रत्येकी पंधराने रुपये दरमहा देऊन वास्तव्यास हाेत्या. आठ दिवसांपूर्वीच त्या बांग्लादेशातून नाशिकमध्ये दाखल झाल्या असताना ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रताप गिरी यांना या महिलांची गोपनीय माहिती समजताच, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना कळविले. गुन्हेशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या आदेशान्वये उपनिरीक्षक सविता उंडे, चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, श्रेणी उपनिरीक्षक किरण शिरसाठ, अंमलदार शर्मिला कोकणी, मनिषा सरोदे, अनुजा येलवे यांसह प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, योगीराज गायकवाड, उत्तम पवार, महेश साळुंके, नाझीमखान पठाण, रोहिदास लिलके, मिलिंदसिंग परदेशी, विशाल देवरे, सुक्राम पवार, समाधान पवार, गोरक्ष साबळे, राहुल पालखेडे, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, आप्पा पानवळ यांनी ही कारवाई केली.




