Friday, May 31, 2024
Homeनाशिकइगतपुरी येथील केपटाऊन व्हिलाच्या विरोधात आमरण उपोषण

इगतपुरी येथील केपटाऊन व्हिलाच्या विरोधात आमरण उपोषण

इगतपुरी | Igatpuri

शेतकऱ्याची फसवणूक करून बळकावलेल्या जमिनीवर इगतपुरी महामार्गालगत (Igatpuri Highway) केपटाऊन व्हिला (Capetown Villa) रहिवाशी संकुल उभारले आहे.

- Advertisement -

यामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायावर (Unauthorized business) कारवाई व्हावी, बळकावलेली जमीन परत मिळावी या मागणीसाठी पीडित शेतकरी सखाराम खातळे १५ ऑगस्टपासून इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर (Igatpuri Tahsildar Office) आमरण उपोषणास (Agitation) बसले आहे.

याबाबत निवासी नायब तहसीलदार प्रविण गोंडाळे (Pravin Gondale) यांना ५ दिवसांपूर्वी निवेदन देऊनही काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आमरण उपोषण सुरू केले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहील, असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

याबाबत उपोषणार्थी शेतकऱ्याने दिलेली अधिक माहिती अशी की, इगतपुरी येथील सर्वे नं. २२४/१, २२४/२ पैकी लेआऊट प्लॉट क्र.१ व २ या मिळकती लगत सर्वे नं. २२५ ची मिळकत आहे. या जमिनीवर पीडित शेतकरी सखाराम भिकाजी खातळे यांची फसवणुक करून श्री साई डेव्हलपर्स यांनी केपटाऊन व्हिलाज रहिवाशी संकुल बांधले.

याबाबत न्यायालयाने व्हिलाजचे बांधकाम बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच जो पर्यंत या केसचा निकाल लागत नाही तो पर्यंत हे बंगले कोणीही वापरू नये असा आदेश झाला आहे.

ही बाब न्यायप्रविष्ठ असुनही या संकुलात अनधिकृत व्यवसाय सर्रासपणे सुरू आहे. या बंगल्यात येणारे पर्यटक मद्यप्राशन करीत धिंगाणा करत असून अनेक मादक पदार्थाचे सेवन व विक्री केली जाते. यामुळे स्थानिक रहिवाशी व संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत पोलीस ठाणे (Police Station) व तहसील कार्यालय आणि पोलीस यांना शेतकऱ्याने निवेदन दिले. मात्र सबंधितांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट तक्रार का केली म्हणुन श्री साई डेव्हलपर्सचे अधिकारी शेतकरी सखाराम खातळे यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. अखेर आजपासून सखाराम खातळे इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

भुमिपुत्रांच्या वडिलोपार्जित जमिनीवर बाहेरील बिल्डर असे अतिक्रमण करून जमीन बळकावत असेल तर ही फारच भयंकर बाब आहे. खातळे यांना न्याय मिळावा म्हणून शिवशाही संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे.

– ॲड. रोहित उगले, अध्यक्ष, शिवशाही संघटना.

- Advertisment -

ताज्या बातम्या