नाशिक | Nashik
गेल्या काही दिवसांपासून समोर आलेल्या महिला अत्याचाराच्या (Women Oppression) घटनांनी महाराष्ट्र (Maharashtra) हादरुन गेला आहे. याच घटनांच्या निषेधार्थ आज शनिवार (दि. २४ ऑगस्ट) रोजी सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, न्यायालयाने (Court) बंद पुकारता येणार नाही, असे स्पष्ट करत बंद मागे घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर विरोधी पक्षांनी बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले.
हे देखील वाचा : पुण्यात भर पावसात शरद पवारांच्या नेतृत्वात मविआचे आंदोलन; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मात्र, या काळात महाराष्ट्रभर विविध ठिकाणी दिवसभर आंदोलने (Agitation) केली जातील, असेही स्पष्ट केले होते. यानंतर आज सकाळपासून महाविकास आघाडीकडून (Mahavika Aaghadi) राज्यभरातील विविध ठिकाणी निषेध आंदोलने केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज नाशकात (Nashik) मविआच्या वतीने विविध ठिकाणी काळ्या फिती लावून मूक आंदोलने करण्यात आली.
हे देखील वाचा : संपादकीय : २४ ऑगस्ट २०२४ – पर्यावरण पूरकतेकडे पाऊल
शहरातील शालिमार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मविआच्या वतीने काळ्या फिती लावून मुक आंदोलन करण्यात आले. यावेळी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा