नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण (Reservation) मिळावे यासाठी जालना (Jalna) येथे उपोषण सुरू होते. या उपोषणाच्या (Hunger Strike) ठिकाणी पोलिसांनी (Police) अतिरेक करून आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केल्याच्या निषेधार्थ नाशिकरोड (Nashik Road) येथील महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे राज्य सरकारचा निषेध करून घोषणा देण्यात आल्या…
Video : नाशकात मराठा समाजाकडून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी
येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) चौक येथे सदरचे आंदोलन (Agitation) करण्यात आले. तसेच जालना येथे पोलिसांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर जो लाठीमार केला त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी टरबूज देखील फोडण्यात आले. शिवसेना उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले
Uddhav Thackeray : “मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यामागे…”; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
दरम्यान, याप्रसंगी माजी आमदार योगेश घोलप, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पाटील, मोगल मुन्ना अन्सारी ,काँग्रेसचे दिनेश निकाळे, तसेच नितीन चिडे, योगेश गाडेकर, मसूद जिलानी, किरण डहाळे, अतुल धोंगडे, सागर भोजने, अनिता दामले, अरुणा आहेर, कामिल इनामदार, पोपट हागवणे, सिद्धार्थ गांगुर्डे, सुनिल निरभवणे, राहुल बागुल, तोफीक पठाण, राजेश करांडे, सदाशिव बोराडे यांच्यासह आदी उपस्थित होते.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
चंद्रानंतर आता ‘इस्रो’चा ‘सूर्य नमस्कार’! ‘आदित्य एल१’चं आज प्रक्षेपण; नेमकं काय साध्य होणार? जाणून घ्या सविस्तर