पाळे खुर्द | वार्ताहर
येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कळवण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने कळवण येथील शिवतीर्थावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
- Advertisement -
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठा समाज बांधवांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले. मराठा समाजाला तत्काळ आरक्षण जाहीर करावे, मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलीस निरीक्षक खगेन्द्र टेंभेकर, पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. सायंकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने या लाक्षणिक उपोषणात सामील झाले.