Wednesday, May 29, 2024
Homeजळगावठाकरे गट-भाजपामध्ये आंदोलनवॉर

ठाकरे गट-भाजपामध्ये आंदोलनवॉर

जळगाव । jalgaon

विदर्भ दौर्‍यावर असतांना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कलंक असल्याची टीका केली होती. या टीकेचे पडसाद राज्यभरात उमटले. भाजपाने या टीकेला उत्तर देण्यासाठी जळगाव शहरात बुधवारी उध्दव ठाकरे यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेवर शाई टाकून काळे फासले. भाजपाच्या या आंदोलनाला ठाकरे गटानेही जोरदार प्रत्युत्तर देत शहरातील महापालिका चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. नितेश राणे, आ. रवी राणा यांच्या प्रतिमेला जोडे मारून काळे फासले.

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल अपशब्द वापरल्या बद्दल भारतीय जनता युवा मोर्चा, जिल्हा महानगरतर्फे टॉवर चौक येथे उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक फोटोवर शाई लावून व जोडे मारून निषेध करण्यात आला. पुन्हा असे वक्तव्य केल्यास भाजपा अधिक आक्रमकपणे उत्तर देर्ईल असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच भाजपा पदाधिकार्‍यांनी उध्दव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनात भाजपा जळगाव महानगरध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, माजी महापौर सिमा भोळे, युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, सरचिटणीस अक्षय जेजुरकर, महिला आघाडी अध्यक्ष दीप्ती चिरमाडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, राहुल मिस्त्री, राहुल लोखंडे, स्वामी पोतदार, सागर जाधव, चिटणीस अश्विन सैनदाने, रोहित सोनवणे, प्रसिध्दी प्रमुख गौरव पाटील, मंडळ अध्यक्ष दिनेश पुरोहित, हर्षल चौधरी, समर्थ राणे, शक्ती महाजन, राजेंद्र मराठे, राहुल वाघ, अनिल जोशी, रेखा वर्मा, सरोज पाठक, नंदिनीताई दर्जी, संगीता पाटील, रेखा पाटील, आर्यन शेठ, मयूर राजपुत, हमीद शेख, अफसर शेख, सुभाष शौचे, हेमंत जोशी, जीभाऊ वानखेडे, जहांगीर खान, राहुल पाटील, केदार देशपांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपाने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रतिमेवर शाई फेक आंदोलन केल्यानंतर ठाकरे गटाकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. ठाकरे गटातर्फे महापालिकेसमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे तसेच रवी राणा यांच्या प्रतिमेला जोडे मारून, काळी शाई टाकून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, मानसिंग सोनवणे, समन्वयक अंकुश कोळी, जकिर पठाण, उप जिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, तालुका प्रमुख उमेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील, उप महानगर प्रमुख गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, पिंटू सपकाळे, फरीद खान, शाकीर शेख, किरण भावसार, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, नीलू इंगळे, निता संगोळे, युवासेना जिल्हाप्रमुख पियूष गांधी, उप जिल्हाप्रमुख विशाल वाणी, महानगर प्रमुख यश सपकाळे, अमोल मोरे, महेश ठाकूर, डॉ जुबेर शेख, संजय सांगळे, आबिद खान, बजरंग सपकाळे, श्रीकांत आगळे, शोएब खाटीक, सलीम खाटिक, जमीर नागरी, विजय राठोड, राजेश वारके, शैलेश काळे, सचिन पाटील, निलेश ठाकरे, किरण पवार, इमाम पिंजारी, विनोद सपकाळे, योगेश चौधरी, सलीम शेख आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या