नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना – एनडीसीए – 2022-23 हे 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने या हंगामात जिल्हा क्रिकेट संघटना विविध नवनवीन उपक्रम हाती घेत आहे. त्यात सध्याच्या सायबर, इंटरनेट व डिजिटल युगाला साजेशे असे अजून एक अतिशय महत्वपूर्ण पाऊल टाकण्यात येत आहे.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्वसामन्यांचे थेट प्रसारण करण्याचे निश्चित झाले आहे. स्पोर्टवोट, मुंबई नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्वसामन्यांचे प्रसारण करेल आणि एन.डी.सी.ए अंतर्गत सर्व खेळाडूंची प्रोफाइलिंग करणार आहे.
मुंबईतील स्पोर्ट्स-टेक कंपनीच्या माध्यमातून स्पोर्टवोट हे टेक स्टार्ट-अॅप आपल्या क्लाउड-स्टुडिओ आणि अँपद्वारे स्थानीय स्तरावर डिजिटायझेशन आणि कार्यप्रदर्शन विश्लेषणाची सवय विकसित करीत आहे. आणि भारतीय क्रीडा समुदायात एक प्रकारची क्रांती आणत भारतीय क्रीडा विश्वातील एक आघाडीचा ब्रँड बनत आहेत.
या माध्यमातून प्रत्येक खेळाडूच्या खेळाचा, त्याच्या रेकॉर्डचा मागोवा ठेवत त्यांचा डेटा सांभालला जाईल. एन.डी.सी.ए सह स्पोर्टवोटची नाशिकमधील 2 हजार पेक्षा जास्त उदयोन्मुख क्रिकेटपटूंना त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक व्यासपीठ देण्याची योजना आहे. शहर व जिल्हातील सर्व खेळाडूंना या गटबंधनामुळे मोठा फायदा मिळणार आहे. नाशिक क्रिकेटबद्दलच्या प्रत्येक माहितीसाठी स्पोर्टवोट हे अँप डाउनलोड करुन त्यावर माहीती अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा क्रिकेट संघटनेचे सराचिटणिस समीर रकटे यांनी केले.
स्पोर्टवोटने अनेक खेळांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. एनडीसीएसोबत त्यांचे डिजिटल सहयोगी म्हणून जोडले आहेत. स्पोर्टवोटचे स्थानीय क्रीडा समुदायाला सक्षम बनवण्याचे ध्येय असून, नाशिकमध्ये खर्या अर्थाने आशादायक चित्र आहे. त्यांची प्रतिभा वाढवण्यास हे माध्यम मदत करू शकेल.
-शुभांगी गुप्ता स्पोर्टवोटच्या सह-संस्थापक