Saturday, May 25, 2024
Homeनंदुरबारशेतीचा वाद ; गोळीबारात बाप-लेक ठार

शेतीचा वाद ; गोळीबारात बाप-लेक ठार

शहादा । मलगाव (ता.शहादा) nandurbar

शिवारातील पिपल्यापाडा येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन गटात तुफान हाणामारी झाली. हा वाद एवढा विकोपाला गेला क त्यातून थेट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात पिता व पुत्र असे दोन जण ठार झाले अन्य तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे .दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या ताफा घटनास्थळी दाखल झाला.या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अद्याप आरोपींना अटक झालेली नाही.दरम्यान घटनेतील आरोपींकडे गावठी पिस्तूल व तलवारी आल्या कोठून असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

- Advertisement -

मध्य प्रदेश राज्याच्या सीमेलगत असलेल्या मलगाव गावाजवळील (ता. शहादा)शिवारातील पिपल्यापाडा येथे एकाच कुटुंबातील दोन गटात भाऊबंदकीमध्ये शेत जमिनीच्या वाद होता याच वादातून आज दोन्ही गटात शेतातच वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला जाऊन थेट हाणामारीत रूपांतर झाले. या हाणामारीत तलवारी, विळा, लाकडी दांडके, आदी हत्यारांचा वापर करण्यात आला. हाणामारी एवढ्यावरच न थांबता

थेट गावठी पिस्तूलातून दोन राउंड फायर करण्यात आले. या गोळीबारात अविनाश सुकराम खर्डे (वय 26)रा. मलगाव (ता.शहादा) जागीच ठार झाला तर त्याचे वडील सुखराम कलजी खर्डे (वय 54)यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.तर सुकराम कलजी खर्डे (वय42),गणेश दिवाण खर्डे (वय 24),रामीबाई दिवाण खर्डे सर्व रा. मलगाव (ता. शहादा)सुनील राजेंद्र पावरा (वय 23),अरुण राजेंद्र पावरा दोघे रा. बेडीया (ता. पानसेमल,मध्यप्रदेश) आदी पाच जणांचा जखमीमध्ये समावेश आहे. यात मयत अविनाश खर्डे यांचे काका रायसिंग कलजी खर्डे यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत 14 आरोपींचा समावेश असून शहादा पोलिसात दोन वेगवेगळ्या फिर्यादी झाल्या आहेत. त्यात देवेसिंग रायसिंग खर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सुनील राजेंद्र पावरा, गणेश दिवाण खर्डे, सोनीबाई गणेश खर्डे, अरुण राजेंद्र पावरा, ललिताबाई राजेंद्र पावरा, रमीबाई दिवाण खर्डे यांनी शासकीय जमिनीचा मालकी हक्कावरुन फिर्यादी देवेसिंग खर्डे यांचा शेतात वरील आरोपिंना आमच्या शेतात निंदनी का करतायेत असे सांगितल्याचा राग येऊन तलवार, विळा व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. सुनील पावरा याने गावठी कट्ट्याने फिर्यादीचा भाऊ अविनाश याचा छातीवर गोळी मारुन जागीच ठार केले.

तर वडील सुखराम खडे काका सुकराम खर्डे यांच्यावरही गोळी झाडून गंभीर जखमी केले. त्यात वडील सुखराम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला म्हणून वरील सहाही आरोपींविरुद्ध कलम 302 अन्वये खुणाच्या व दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा तपास सपोनि नितीन पाटील करीत आहेत.दुसर्‍या घटनेत सोनीबाई गणेश खर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सुकराम कलजी खर्डे,अविनाश सुकराम खर्डे, रायसिंग कलजी खर्डे, ममता सुकराम खर्डे, शकुंतला रायसिंग खर्डे, देविदास रायसिंग खर्डे, निलेश रायसिंग खर्डे, जगदीश रायसिंग खर्डे (सर्व रा. मलगाव) या आठही आरोपींनी फिर्यादीचा शेतात जमिनीवर कब्जा करण्याचा उद्देशाने अनधिकृतपणे प्रवेश करून वाद घालून लोखंडी सळी,लाकडी डेंगारे व लाठ्या काढ्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून वरील आरोपींविरुद्ध कलम 307 अन्वये व दंगलीच्या गुन्हा दाखल झाला आहे. घटनेच्या तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते करीत आहेत. दरम्यान घटनास्थळी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व अधिकार्‍यांनी मोठ्या फौज फाट्यासह दाखल होत परिस्थिती वर नियंत्रण मिळविले. यावेळी अप्पर पोलीस निरीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली

- Advertisment -

ताज्या बातम्या