Saturday, May 25, 2024
Homeनगरशेती वाद परस्पर विरोधी गुन्हे दाखल

शेती वाद परस्पर विरोधी गुन्हे दाखल

अकोले |प्रतिनिधी| Akole

शेतीच्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन अकोले पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले. दोन्ही बाजुचे सात जणांना अटक करुन न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कुंभेफळ येथील दोन भावाच्या कुटुंबातील शेतीचे वाद असताना 4 ऑगस्ट रोजी शेतातील गिन्नी गवत काढण्याच्या कारणावरून मारामारी होऊन गळ्यातील चेन घेऊन पळाल्याने परस्पर विरोधी गुन्हे दाखल होऊन दोन्ही कुटुंबातील सात जणांना अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य

याबाबत पहिल्या फिर्यादीत पूजा मनोहर पांडे यांनी म्हटले आहे की, 4 ऑगस्ट 2023 रोजी फिर्यादीचे पती मनोहर भाऊसाहेब पांडे व सासु चंद्रभागा भाऊसाहेब पांडे हे कोर्ट कामासाठी अकोलेत गेले असता फिर्यादी एकटी असताना 12:30 ते 1 वाजेच्या दरम्यान घराजवळ असलेल्या शेतामध्ये शुभांगी रविंद्र पांडे, सिंधुबाई कारभारी पांडे या आमच्या शेतात येवून गिन्नी गवत, ज्वारी, घेवडा उपटण्यास सुरुवात केल्याने फिर्यादिने तिथे जाऊन हे क्षेत्र आमचे आहे. त्यातील आमचे पिके उपटु नका असे म्हणाल्याने त्याचा राग आल्याने शुभांगी रविंद्र पांडे, सिंधुबाई कारभारी पांडे यांनी तुझ्या बापाची पेंड आहे का? अशी शिवीगाळ करत फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने फिर्यादी खाली पडली असता काठीने हातावर, पाठीवर, मानेवर व डोक्यात मारहाण केली व फिर्यादी पतीला फोन लावत असतानाही मारहाण करुन फोन खाली पडला असता तो उचलून घेऊन गेल्या व नंतर दुपारी 1 वा कारभारी रामु पांडे व रविंद्र कारभारी पांडे फिर्यादीच्या घराजवळ येऊन तुझ्या बापाची पेंड आहे का असे म्हणून शिवीगाळ करु लागले यावेळी फिर्यादीची मुलगी घरात रडू लागल्याने फिर्यादी घरात गेली असता रविंद्र पांडे तिच्यामागे घरात जावुन तिला ढकलुन गच्ची धरून गळ्यातील पोत घेऊन पळून गेला असल्याचे फिर्यादीवरुन शुभांगी रविंद्र पांडे, सिंधुंबाई कारभारी पांडे, रविंद्र कारभारी पांडे, कारभारी रामु पांडे यांच्याविरुद्द गुन्हा रजिस्टर नंबर 494/2023 भारतीय दंड संहिता कलम 327, 452, 323, 324, 504, 34 प्रमाणे दाखल करुन पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या

तर दुसरी फिर्यादी शुभांगी रविंद्र पांडे हिने दिली असुन यात म्हटले आहे कि, 4 ऑगस्ट रोजी पती व सासरे कोर्टाचे कामासाठी अकोलेत गेले असता फिर्यादी व तिची सासु सिंधूबाई कारभारी पांडे घरी असताना दुपारी 12:30 ते 1 वाजेच्या सुमारास पूजा मनोहर पांडे ही फिर्यादीच्या शेतात येऊन शेतातील मका, बिन्नी गवत, सोयाबीन उपटत होती म्हणून फिर्यादी तेथे जावुन पूजा पांडे हिस तु आमच्या शेतातील पिके का उपटत आहे असे म्हटले असता तिने तुम्ही लई नाटके करता असे म्हणत असे लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरूवात केली तेव्हा फिर्यादीची सासु सिंधुबाई भांडण सोडवण्यासाठी मध्ये आली असता तिलाही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने फिर्यादी व सासु दोघी घरी गेलेनंतर तिथे मनोहर भाऊसाहेब पांडे व चंद्रभागा भाऊसाहेब पांडे हे आले व फिर्यादी व तिची सासुला शिवीगाळ करण्यास सुरूवात केल्याने फिर्यादी व सासु घाबरून घरात गेले असता मनोहर पांडे व चंद्रभागा पांडे घरात घुसून फिर्यादी व सासुबाई यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असताना फिर्यादीचे पतीचे गाडीचा आवाज आल्याने मनोहर पांडे व चंद्रभागा पांडे यांनी फिर्यादीच्या गळ्यातील पोत तोडून घेऊन पळून गेले. या फिर्यादीवरुन पोलिसांनी पूजा मनोहर पांडे, मनोहर पांडे, चंद्रभागा पांडे यांच्या विरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 495/2023 भारतीय दंड संहिता कलम 327, 452, 323, 504, 33 प्रमाणे दाखल केला आहे. पोलिसांनी वरील तिघांना अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.

जिल्ह्यासाठी आणखी आठ फिरते पशूचिकित्सालय

- Advertisment -

ताज्या बातम्या