Friday, April 25, 2025
Homeनगरकृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेचा तिसरा हप्ता मंजूर

कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेचा तिसरा हप्ता मंजूर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या तिसर्‍या हप्त्यासाठी 15 कोटी 15 लाख रुपयांच्या वितरणास राज्य शासनाने काल बुधवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकर्‍यांना ट्रॅक्टर, यंत्रे आणि अवजारे अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार असल्याची माहिती शासन निर्णयात देण्यात आली आहे.

- Advertisement -

2024-25 या आर्थिक वर्षात राज्यातील पात्र शेतकर्‍यांसाठी केंद्र सरकारने 9 कोटी 9 लाख रुपयांचा तर राज्य सरकारचा हिस्सा 6 कोटी 6 लाख रूपये असा एकूण 15 कोटी 15 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. मंजूर निधी कृषी आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे. यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी 5 कोटी, अनुसूचित जातीसाठी 5 कोटी 66 लाख 67 हजार रूपये आणि अनुसूचित जमातीसाठी 4 कोटी 48 लाख 33 हजार रूपयांची तरतूद केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...