Saturday, May 4, 2024
Homeनगरबाजारसमिती उपसभापतीचा पती जेरबंद

बाजारसमिती उपसभापतीचा पती जेरबंद

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Agricultural Produce Market Committee) भुखंड देण्याचे अमिष दाखवून महीलेवर बलात्कार (Woman Rape) केल्याप्रकरणी बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) उपसभापतीचा फरार पतीस अहमदनगर येथून अटक (Arrested) करण्यात आली. न्यायालयाने (Court) त्यास न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली आहे.

- Advertisement -

प्राथ.शिक्षक राजेंद्र विलास गर्जे (रा.पागोरी पिंपळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पिडीत महिलेच्या तक्रारीवरून 3 आक्टोबर 2021 रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल (Filed a Rape Case) केला होता. पिडीतेला बाजार समितीचा भुखंड देण्याचे अमिष दाखवून पाथर्डी येथे तसेच तीच्या घरी तीच्यावर बलात्कार (Rape) केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता.

गुरुवारी नगर शहरात जिल्हा पोलिस प्रमुखांना खब-याने दिलेल्या माहीती वरुन राजेंद्र गर्जे याला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले व पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.शुक्रवारी तपासी अधिकारी पोलिस उपनिरिक्षक श्रीकांत डांगे यांनी राजेंद्र गर्जे यास पाथर्डी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश बिराजदार यांनी गर्जे याला 29 ऑक्टोबर 2021 पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या