Thursday, January 29, 2026
Homeक्राईमकृषी सोलर पंप योजनेत सव्वा पाच लाखांची फसवणूक

कृषी सोलर पंप योजनेत सव्वा पाच लाखांची फसवणूक

तालुक्यातील एजंट विरोधात पोलिसात तक्रार

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शासन अनुदानातून मिळणार्‍या कृषी सोलर पंप योजनेत आईच्या नावावर मंजूर झालेला पंप मध्यस्थाने परस्पर दुसर्‍याला विकत सव्वा पाच लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार उमेश वाखुरे (रा. पाथर्डी) याने पोलिसांकडे केली आहे. याबाबत वाखुरे याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, खेर्डे गावात आई हौसाबाई वाखुरे हिच्या नावावर शेत जमीन आहे. मी दुलेचांदगाव येथील एजंट प्रशांत मरकड याच्यांकडे कागदपत्रे सादर करत त्याला 75 हजार रुपये दिले व ओटीपीसाठी माझा मोबाईल क्रमांक दिला.

- Advertisement -

मात्र एजंटने संबंधित कंपनी, कंपनीचे कर्मचारी यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे व बनावट सर्व्हे रिपोर्ट तयार करून आम्हाला मंजूर झालेला सोलर पंप अ परस्पर दुसर्‍याला देऊन फसवणूक केली आहे. योजनेत ऑनलाईन अर्ज भरतांना एजंटने माझा मोबाईल नंबर न टाकता दुसर्‍याचा नंबर टाकला. या संदर्भात महावितरणच्या कार्यालयात गेलो असता, तेथील संगणकामध्ये अपलोड करण्यात आलेला आईचे दुसर्‍याच महिलेचा आहे. त्यांना लाभार्थी म्हणून दाखवण्यात ओले आहे. या फोटोत संबंधीत एजंट यांचाही फोटो असून संबंधीत सोलर पंप हा दुलेचांदगाव येथील शेतात बसवण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात फसवणूक झाली असून फसवणूक करणार्‍याच्या विरोधात कारवाई करून नवीन पंप द्यावा, अशी मागणी वाखुरे याने आपल्या तक्रारीत केलेली आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या अंत्यसंस्कारापूर्वी शरद पवारांनी हात जोडले,...

0
बारामती | Baramati राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी काल (बुधवारी) बारामतीमध्ये एका भीषण विमान...