Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजManikrao Kokate : "कर्जमाफीच्या पैशांचं करता काय? साखरपुडा, लग्न..."; कृषीमंत्र्यांचा शेतकऱ्यांना सवाल 

Manikrao Kokate : “कर्जमाफीच्या पैशांचं करता काय? साखरपुडा, लग्न…”; कृषीमंत्र्यांचा शेतकऱ्यांना सवाल 

नाशिक | Nashik

अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) राज्यातील अनेक भागात हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) नाशिकमधील (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात गेले होते. यावेळी त्यांनी ‘कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशांचे तुम्ही काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल करत शेतकऱ्यांना सुनावले.

- Advertisement -

मंत्री कोकाटे यांना शेतकरी कर्जमाफीबाबत एका शेतकऱ्याने (Farmer) प्रश्न विचारला की, ‘अजितदादा बोलले की कर्जमाफी होणार नाही, रेग्यूलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का?’ असे म्हटले. त्यावर बोलतांना कोकाटे म्हणाले की,”पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता, तोपर्यंत कर्ज भरत नाही. कर्जमाफी (Loan Waiver) झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात, त्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? असे म्हटले.

कोकाटे पुढे म्हणाले की, “सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये (Farm) गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत, सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करते. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा”. असे विधान त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून केले.

आधीही शेतकऱ्यांबाबत केले होते वादग्रस्त विधान

मंत्री कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणले होते की, “हल्‍ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही. आम्‍ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली. ही योजना चांगली आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. पण, या योजनेलाही गैरव्यवहाराचे ग्रहण लागले. यामुळे सरकार अडचणीत आलेले नाही, पण यातून आता काही सुधारणा निश्चितपणे कराव्या लागणार आहेत. ही योजना सरकारला कोणत्याही स्थितीत बंद करायची नाही. त्यात सुधारणा करायची आहे”, असे म्हटले होते. यावरून कोकाटे यांच्यावर शेतकऱ्यांसह विरोधकांनी टीका केली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...