Friday, May 3, 2024
HomeUncategorizedकृषी वार्तापत्र : राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांचा सोयाबीनकडे कल

कृषी वार्तापत्र : राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांचा सोयाबीनकडे कल

सार्वमत

राजेंद्र बोरसे

- Advertisement -

शिर्डी – राहाता तालुक्यात यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावली असून दुसर्‍या आठवड्यात बर्‍यापैकी पाऊस झाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. या काळात तालुक्यात उसाशिवाय 56.53 टक्के खरीप पेरण्या व पिकांच्या लागवडी झाल्या आहेत. पेरण्या झाल्यानंतर जूनच्या तिसर्‍या आठवड्यापासून शेतकर्‍यांना पाऊस कधी येईल याची वाट पाहवी लागली. त्यामुळे आता पाऊस पडला तर उर्वरीत पेरण्या करण्यास शेतकर्‍यांना उत्साह निर्माण होऊ शकेल.

राहाता तालुक्यात मृगाच्या नक्षत्राने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या पमणावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली होती. मात्र गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. राहाता तालुक्यात त्याच दिवशी सरासरी 158 मिलीमीटर पाऊस झाला आहे. राहाता तालुक्यात जून महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली. त्यानंतर दोन तीन पाऊस चांगले झाल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साह वाढला होता. त्यानंतर काही काळ पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्‍यांनी पेरण्या करण्यास सुरुवात केली. राहाता तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 25 जूनच्या दरम्यान जास्त पाऊस झाला आहे. मागील वर्षी 17.83 टक्के पाऊस झाला होता तर यावर्षी 35.86 टक्के पाऊस झाला आहे. यवर्षी तालुक्यातील राहाता 179 मिलीमीटर, पुणतांबा 172 मिलीमीटर, बाभळेश्‍वर 184 मिलीमीटर, लोणी 174 मिलीमीटर तर शिर्डी 74 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. राहाता तालुक्यात बाभळेश्‍वर येथे 184 मिलीमीटर सर्वाधिक पाऊस तर शिर्डीत 84 मिलीमीटर इतका कमी पाऊस झाला आहे. तर अन्य मंडलांतही साधारपणे चांगला पाऊस झाला अहे. तसेच पुणतांबा परिसरातही चांगला पाऊस पडला असला तरी पेरणीलायक पाऊस अद्याप झालेला नाही.

तालुका कृषी विभागाकडून यावर्षीच्या राहाता तालुक्यातील खरीप पिकाच्या आकडेवारीनुसार उस लागवडीशिवाय एकूण खरीप क्षेत्रात 56,53 इतक्या पेरण्या झालेल्या आहेत. यात बाजरी 3725 हेक्टर क्षेत्रापैकी 752 हेक्टर, मका 5264 हेक्टर क्षेत्रापैकी 2457 हेक्टर, कडधान्यात तूर 232 हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी 251 हे. क्षेत्रात जास्त पेरणी झाल्याने 108.19 टक्के पेरणी झाली आहे. मूग सरासरी 158 हे. क्षेत्रापैकी केवळ 21 हेक्टर, तेलबियामध्ये भुईमूग सरासरी 425 हेक्टर क्षेत्रापैकी 189 हेक्टर क्षेत्रात 44.47 टक्के, सोयाबीन सरासरी 17505 हेक्टर क्षेत्रापैकी 10452 हेक्टर क्षेत्रात 59.71 टक्के असे एकूण तेलबिया 59.31 टक्के पेरणी झाली आहे. कापूस सरासरी 1511 हेक्टर पैकी 475 हेक्टर पेरणी झाली आहे. एकूण अन्नधान्य व कापूस क्षेत्रात उसाशिवाय 28852 सरासरी हेक्टर क्षेत्रापैकी 14668 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. चारापिके केवळ 5.69 टक्के पेरणी झाली आहे. उसाशिवाय एकूण खरीप क्षेत्र सरासरी 28852 हेक्टर क्षेत्रापैकी 16309 हेक्टर क्षेत्रात पेरणी होवून 56.53 टक्के पेरणी झाली आहे.

राहाता तालुक्यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झालेली असली तरी आणखी काही चांगल्या पावसाची आवश्यकता आहे. या तालुक्यात उसानंतर सोयाबीनचे क्षेत्र जास्त आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकर्‍यांचे सोयाबीन भिजल्यामुळे शेतकर्‍यांनी चालू वर्षी कंपनीच्या बियाण्याला पंसती दिली. मात्र चांगला पाऊस होऊन योग्यवेळी पेरणी करून सुद्धा सदोष बियाण्यामुळे सोयाबीन उगवले नाही. त्यामुळे या शेतकर्‍यांचा पेरणी, बियाणे, खते, मशागत यांचा खर्च वाया गेला आहे. तसेच त्यांच्यापुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

खरीप तृणधान्य 35.70 टक्के, खरीप कडधान्य 83.25, खरीप अन्नधान्य 37.78, एकूण तेलबिया 59.31, कापूस 31.44, उसाशिवाय एकूण अन्नधान्य व कापूस क्षेत्र 50.84, रुपांतरीत पीक क्षेत्र 5.69 उसाशिवाय खरीप एकूण क्षेत्र 56.53 ट्क्के पेरण्या झाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या