Sunday, May 26, 2024
Homeनाशिकगावोगावी कृषीमाल प्रक्रिया उद्योग सुरू व्हावा

गावोगावी कृषीमाल प्रक्रिया उद्योग सुरू व्हावा

नाशिक । प्रतिनिधी Nashik.

निसर्गाचा लहरीपणा तसेच ग्लोबल वॉर्मिंग अशा संकटांमुळे आज शेतकरी खूप मोठ्या अडचणीत सापडला आहे. पिकविण्याची बुध्दी त्याच्याकडे आहे, पण विकण्याचे ज्ञान मात्र नाही. म्हणूनच ग्रामीण भागात कृषिमाल प्रक्रिया उद्योग सुरू होणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर मधमाशी पालन व्यवसाय हा पर्यटन उद्योगाला चालना देऊ शकतो, हे पिंपळगाव येथील बसवंत मधमाशी प्रशिक्षण केंद्राने सिध्द केले आहे, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले.

- Advertisement -

पिंपळगाव (बसवंत) येथील ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम प्रा. लि. संचलित बसवंत कृषी उद्योग पर्यटन केंद्राच्या वतीने दि. 1 ते 10 ऑगस्ट 2023 दरम्यान आयोजित राज्यस्तरीय प्राचार्य/मुख्याध्यापक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, शेतीपूरक पर्यावरण निर्माण करून आणि निसर्गाशी मैत्री करून त्याचे संवर्धन कसे करता येईल, याचे छान प्रात्यक्षिक बसवंत मधमाशी प्रशिक्षण केंद्राद्वारे विविध उपक्रमांतून दाखवले जात आहे. या केंद्राच्या माध्यमातून; तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी मधमाशी पालन व्यवसायाला ओल्ड इन न्यू वे या दृष्टीने नवीन परिमाण देऊन, संजय पवार यांनी हा प्रकल्प सुरू केला आहे. येथे विद्यार्थी सहली आयोजित करून त्यांना ज्ञान आणि त्याबरोबरच मनोरंजनाचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी उपस्थित प्राचार्य व मुख्याध्यापकांना केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. प्रमोद रसाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. बी. बी. पवार, डॉ. भास्कर गायकवाड, कल्पेश गोसावी, प्रदीप देशपांडे आदी मान्यवर व्यासपीठावर होते. याप्रसंगी ग्रीनझोन ग्रोकेमचे तांत्रिक संचालक डॉ. भास्कर गायकवाड, विजय पवार, महेश पाटील, संदीप वाघ, संदीप सोनवणे, नितीन कराळे आदींसह राज्यभरातील अनेक प्राचार्य/ मुख्याध्यापक उपस्थित होते. डॉ. गायकवाड यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन सायली लभडे यांनी केले. या परिषदेत प्राचार्य व मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहेत.

मधमाशी पालन प्रशिक्षण केंद्रातून मधु-उद्योजकतेचे; तसेच त्या अनुषंगाने निसर्गस्नेही अशा प्रकल्प व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन केले जाते. रूढ शालेय शिक्षणाची धुरा वाहणार्या प्राचार्य/ मुख्याध्यापकांच्या सहभागातून हे कार्य अधिक व्यापक आणि विद्यार्थिकेंद्री करण्याचे उद्दिष्ट या परिषदेच्या आयोजनामागे आहे. डोंगरदर्‍यांतील साहसी पर्यटनातील संभाव्य धोके लक्षात घेता, या केंद्रातील सुरक्षित वातावरणात साहसी खेळ तसेच विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे ज्ञानाबरोबरच मनोरंजनही होते, असे पूर्वा केमटेक प्रा.लि.चे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी प्रास्ताविक करताना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या