अहमदाबाद | Ahemdabad
अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर एआय-१७१ विमान कोसळून भीषण अपघात झाला होता. या विमानात एकूण २४२ जण प्रवास करत होते. अहमदाबादवरुन लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतले असताना काही सेकंदात ते कोसळले. मात्र आता अहमदाबाद विमान अपघातातील मृतांची संख्या २७४ वर पोहोचली आहे. अपघाताच्या वेळी ज्या बीजे मेडिकल कॉलेजवर विमान कोसळले त्या वसतिगृहाच्या इमारतीत ६० हून अधिक डॉक्टर, विद्यार्थी आणि काही इतर लोक उपस्थित होते. त्यापैकी ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या २७५ वर पोहोचली आहे (२४२ प्रवासी आणि ३४ जण मेडिकल कॉलेजचे).
विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्स मिळून २४१ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. आता मृतांच्या वाढत्या संख्येवरून असे दिसून येते की उर्वरित ३३ बळी हे अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमधील असलेले लोक असावेत. ज्या ठिकाणी विमान कोसळले. विमानात २४२ लोक होते, ज्यात १२ क्रू मेंबर्स होते. तर या अपघातात एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या वाचला आहे.
मृतांमध्ये १० डॉक्टर आणि त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. विमानाचा ढिगारा काढण्याचे काम रात्रभर सुरू आहे. या कामात १०० हून अधिक कामगार आणि ४० इंजिनिअर गुंतले आहेत. तपास अधिकाऱ्यांना अपघातानंतर २८ तासांनी बीजे मेडिकल कॉलेज कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या मेसच्या छतावर ब्लॅक बॉक्स सापडला. त्यामुळे आता अपघाताचे नेमके कारण समजण्यास मदत होणार आहे.
आत्तापर्यंत ७ जणांचे नमुने सोपावले
आतापर्यंत ७ मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत, २४१ जणांच्या डीएनएचे नमुने घेण्यात आले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डीएनए नमुन्याचे नमुने घेण्याचे काम सुरू आहे. कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी चर्चा केली जात आहे. आतापर्यंत ७ मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत.
दरम्यान, विमानातील २४१ जणांच्या व्यतिरिक्त मृतांमध्ये तीन डॉक्टर आणि एका गर्भवती महिलेचा समावेश होता. ही गर्भवती महिला न्यूरोसर्जरी करणाऱ्या डॉक्टरची पत्नी होती. चौथा मृतदेह एमबीबीएसचा विद्यार्थी जय प्रकाश चौधरी याचा आहे. तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. शुक्रवारी कुटुंबियांनी जय प्रकाशचा मृतदेह ओळखला.
८ संस्था विमान अपघाताची चौकशीसाठी दाखल
विमान अपघाताची चौकशी ८ एजन्सी करत आहेत, राष्ट्रीय तपास संस्था, गुजरात पोलिस, विमान अपघात तपास ब्युरो (AAIB), नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA), युनायटेड किंग्डमची हवाई अपघात चौकशी शाखा (UK-AAIB), युनायटेड स्टेट्सचे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (NTSB), संघीय विमान वाहतूक प्रशासन (FAA).
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





